सांगोला दहा वर्षानंतर पवार साहेबांजवळ बसण्याची संधी मिळाली - आ. शहाजी पाटील
सन्मानाने जगण्याचे संस्कार माणदेशातील माणसांत रुजलेत
आपल्या कष्टाने दुष्काळावर मात करून सन्मानाने जगण्याचे संस्कार माणदेशातील लोकांमध्ये आहे. माणदेशी माणसाला कर्तृत्व सिद्ध करतांना निसर्गही अडवू शकत नाही.
सांगोला - आपल्या कष्टाने दुष्काळावर मात करून सन्मानाने जगण्याचे संस्कार माणदेशातील लोकांमध्ये आहे. माणदेशी माणसाला कर्तृत्व सिद्ध करतांना निसर्गही अडवू शकत नाही.
कष्ट करून जगण्याची भूमिका येथील माणदेशी लोकांमध्ये असल्याने या भागाची ओळख देशातच नव्हे तर जगभरात पसरली असल्याचे कौतुक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त 'माझी वाटचाल' या आत्मचरित्र व गौरव ग्रंथाचे प्रकाशन आणि सपत्नीक सत्कार देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते सोमवार (ता. 8) रोजी करण्यात आला.
या कार्यक्रमात खासदार शरद पवार बोलत होते. यावेळी बाबुराव गायकवाड यांना चांदीची प्रतिकृती असलेली बैलगाडी आणि चांदीचा श्रीकृष्णाचा रथ भेट देण्यात आला.
या कार्यक्रमासाठी गौरव समितीचे अध्यक्ष, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, स्वागताध्यक्ष आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार विनायक पाटील, माजी आमदार राम साळे,
माजी आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमाला गायकवाड, शिवाजीराव काळंगे, पद्मजादेवी मोहिते-पाटील, कविता म्हेत्रे, पी. सी. झपके, राहुल शहा, दादासाहेब रोंगे,
सचिन देशमुख, प्रभाकर चांदणे, प्रा. नानासाहेब लिगाडे, डॉ. पियूष साळुंखे पाटील, तानाजी पाटील, डॉ. प्रभाकर माळी, मारुती बनकर, गटविकास अधिकारी आनंद लोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
शरद पवार बाबुराव गायकवाड यांच्या विषयी बोलताना म्हणाले की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि सामान्य कुटुंबात जन्म घेऊन
बाबुराव गायकवाड यांनी सहकार शिक्षण समाजकारण आणि राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन ते गेली 45 वर्षे माझ्यासोबत काम करत आहेत.
आजच्या तरुणांनी आपल्या क्षेत्रात काम करत असताना बाबुराव गायकवाड यांच्यासारख्या ज्येष्ठांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा.
प्रास्ताविक करताना माजी आमदार दीपक साळुंखे - पाटील म्हणाले, ग्रामीण भागात जन्माला आलेल्या भाऊंनी ग्रामसेवकाची नोकरी स्वीकारली.
त्यानंतर ग्रामसेवकाच्या नोकरीचा राजीनामा देवून पवारांच्या नेतृत्वाखाली राजकीय वाटचाल सुरु ठेवली असल्याचे सांगितले.
सत्कारमूर्ती बाबुराव गायकवाड म्हणाले, पवार साहेब आले तरच अमृतमहोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.
मी स्पष्टवक्ता असल्याने माझं जीवन संघर्षमय झालं आहे. 1985 साली एस. काँग्रेसचा अध्यक्ष झालो. त्यावेळी मी विधानसभेची उमेदवारी मागितली होती,
पण पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही शहाजीबापूचा प्रचार केला. देशाला आज पवार साहेबांची गरज हे त्यांनी देशातील विरोधकांची मोट बांधून देशाचे नेतृत्व करावे असें सांगितले.
दहा वर्षानंतर पवार साहेबांजवळ बसण्याची संधी मिळाली - आ. शहाजी पाटील
शहाजीबापू पाटील म्हणाले की, बाबुरावभाऊ आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व आहे. 1995 रोजी खासदार शरद पवार यांचा आदेश मानून मला पाठींबा दिला आणि माझा पहिला विजय मिळाला
2019 च्या निवडणुकीतही भाऊंनी पाठींबा दिला तेंव्हाच मी पुन्हा आमदार झालो. संपूर्ण तालुक्याच्या राजकारणात गेल्या 50 वर्षांत मला अनेक माणसं पारखता आली.
पण, दिलेल्या शब्दाला पक्का राहणारा माणूस म्हणून बाबूराव गायकवाड यांचा उल्लेख आपल्याला करावाच लागतो.
साहेब, बाबूराव गायकवाड हे नाव माझ्यासाठी नगदी नाणं आहे. सांगोला तालुक्याचे आणि बारामतीचे एक वेगळे नाते आहे.
भाऊंच्या कार्यक्रमामुळे दहा वर्षानंतर मला पवार साहेबांजवळ बसण्याची संधी मिळाली, त्यांचे दर्शन मिळाले हा माझ्यासाठी भाग्याचा दिवस असल्याचे आमदार शहाजी बापूंनी सांगितले.
आमदार शहाजी पाटील झाले भावुक
पवार कुटुंबावर नेहमी टीका करणारे आमदार शहाजी पाटील आज म्हणाले की, मी आज सकाळी अंघोळ करताना भावनिक झालो होतो.
सुमारे दहा वर्षांनी मला आज साहेबांचं जवळून दर्शन होणार होतं. हा योग बाबूराव गायकवाड यांनी घडवून आणला होता.
त्यांचेही माझ्यावर उपकार आहेत. काही व्यक्ती अशा असतात, त्यांना पाहिलं तरी जीवनात एक जिद्द, विचारधारा निर्माण होते. आज त्या रुपाने साहेबांचं दर्शन झालं आहे.
त्यामुळे आज माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे. सांगोला तालुक्यातील जनतेच्या वतीने पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की, साहेबांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो.
माणदेशी माणूस कठीण परिस्थितीशी दोन हात करीत स्वाभीमानाने जगत असतो, हा माणदेशी माणसाचा स्वभाव-धर्म आहे
हे स्पष्टकरुन, बाबुराव गायकवाड यांनी आपल्या आयुष्यातकष्ट आणि जिददीच्या बळावर शिक्षणासह सार्वजनिक क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करुन जीवनात स्वाभीमान बाळगला,
त्यामुळे त्यांचे कार्य समाजासाठी आदर्शच असल्याचे गौरोउदगार राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय क़ृषीमंत्री खासदार शरचद्रंजी पवार यांनी व्यक्त केले.
मा.बाबुरावजी गायकवाड अमृत महोत्स्व गौरव समितीच्यावेतीने येथील रामकृष्ण् व्हिला येथे बाबुराव (भाऊ) गायकवाड यांचा सपत्नीकअमृत
महोत्सवी सत्कार मा.खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी बाबुराव गायकवाड यांच्या “माझी वाटचाल” या आत्म्चरित्राचे आणि “कर्तृत्वसंपन्न् भाऊ”या गौरव ग्रंथाचे प्रकाशन सोहळा संपन्न् झाला. यावेळी पेढा तुलाही करण्यात आली.
कार्यक्रमास आमदार शहाजीबापू पाटील, गौरव समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील, माजी आमदार विनायक पाटील,
माजी आमदार डॉ.राम साळे, माजी आमदार विलासराव जगताप यांचेसह विविध क्षेत्रातील मान्य्वर,गायकवाड कुटूंबीय उपस्थित होते.
यावेळी खासदार पवार म्हणाले, बाबूराव गायकवाड यांनी सार्वजनिक जीवनात काम करताना आपल्या स्वच्छप्रतिमेला अभ्यासाची जोड दिली. जे काम हाती घेतले
ते तडीस नेले, शेती, सहकार, शिक्षण, उदयोग, समाजकारण आणि राजकारण या क्षेत्रामध्ये त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
अल्प्शिक्षित असणा-या बाबुराव गायकवाड यांनी उत्त्म शिक्षण संस्था चालवून, ज्ञानाचा दिप सामान्य् माणसाच्या कुंटूंबामध्ये रोवला. त्यांच्या शैक्षणिक कार्यामुळे सांगोल्याचे जीवनमान बदलले.
कोणतेही काम करताना त्यांनी कोठेही बडेजाव केला नाही. आपले काम निष्ठेने केले. त्यामुळे ते आज समाजासाठी आदर्श् आहेत.
आम. शहाजीबापू पाटील म्हणाले, बाबुराव (भाऊ) गायकवाड म्हणजे दिलेल्या शब्दाला पक्का राहणारा माणूस आहे. ते ज्यावेळी माझ्या गाडीत बसले तेंव्हा माझ्या अंगावर गुलाल पडला.
मी दोन वेळा आमदार झालो. भाऊंनी स्वर्गीय संभाजीराव शेंडे यांचा शैक्षणिक वारसा पुढे तसाच चालू ठेवला आहे.
खासदार शरदचंद्रजी पवार हे त्यांचे राजकीय जीवनातील पांडुरंग आहेत. त्यांनी प्रत्येक संस्था प्रामाणिकपणे चालविली.
आम.दिपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले भाऊंनी जीवनात माणसे जोडण्याचे काम केले. आपले उदयोग व व्यवसाय प्रामाणिकपणे चालविले.
त्यांनी राजकारणात पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगता निष्ठेने काम सुरु ठेवले आहे. त्यांना दिर्घायुष्य् लाभो आणि त्यांना समाज कामाची संधी मिळो अशी अपेक्षा व्यक्त केली.
आम.विनायक पाटील म्हणाले सार्वजनिक जीवनात बाबुराव गायकवाड यांनी शुन्यातून विश्व् निर्माण केले आहे. एक प्रमाणिक कार्यकर्ता म्हणून समाजासाठी ते आदर्श आहेत.
आपल्या अमृत महोत्सवी सत्काराला उत्त्र देताना बाबुराव(भाऊ) गायकवाड म्हणाले,
1974 ला पवार साहेबांची आणि माझी ओळख झाली. त्यांच्या आदेशाचे पालन करीत नोकरीचा राजीनामा दिला. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता जनतेची सेवा केली.
पवार साहेब हे कार्यकर्त्यावर लक्ष देणारे नेते आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर श्रध्दा कायम आहे. म्हणूनच हा कार्यक्रम देखील त्यांच्या प्रमुख उपस्थितीत घेतला आहे.
ते आले आणि शुभेच्छा दिल्या, अतंकरण भरुन आले. शुभेच्छा देण्यासाठी मोठया संख्येने आलेल्या जनसमुदायाचे आभारही त्यांनीव्यक्त केले.
कार्यक्रम सूत्रसंचालन निविदिका सौ.हुले मॅडम यांनी केले तर आभार गौरव समितीचे कार्याध्यक्ष प्रा.पी.सी.झपके यांनी मानले.
कार्यक्रमास सागोला तालुका उच्च् शिक्षण मंडळाचे पदाधिकारी,राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कायकर्ते, महिला बचत गटाच्या कार्यकर्त्या, गावकरी, नातेवाईक,विदयार्थी मोठया संख्येने उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे संयोजन अमृत महोत्स्व गौरव समतीचे सर्व पदाधिकारी, सांगोला महाविदयालय आणि शिवाजी पॉलीटेनिक कॉलेज मधील प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेत्र कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments