ब्रेकिंग न्यूज.. खाजगी वाहनावर पोलीस लिहिण्याचा कोणालाच अधिकार नाही
मित्रांनो आपण कधी कधी रस्त्यावर जात असताना पोलिस नाव Police Name लिहिलेल्या किंवा पोलिस चिन्ह असलेल्या खाजगी गाड्या पाहतो.
वास्तविक पाहता खाजगी वाहनधारक असे पोलीस नाव असलेले पाटी किंवा चिन्ह वापरू शकत नाहीत असा महत्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे. तरीदेखील कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलीस बांधवांकडूनच याचे सर्रास उल्लंघन केले जाते. जे की एकदम चुकीचे आहे.
शहरात अनेक दुचाकी चार चाकी वाहनावर Police Name पोलीस नेमप्लेट किंवा पोलीस चिन्ह असलेले दिसते. मग ते पोलीस असोत किंवा नसोत. अनेक वेळा पोलिस नातेवाईक किंवा मित्र देखील गाडीवर पोलिस नाव टाकून फिरताना दिसतात.
समजा एकेका पोलिसांच्या घरी चार-चार वाहने असल्यास अन् ते वाहन घरातील इतर सदस्य वापरत असल्यास काय समजायचे. अशी वाहने पोलिस तपासणी मधुन सहजासहजी सुटुन जातात. याचा गैरफायदा समाजकंटक, आरोपी , दरोडेखोर, देशविघातक शक्ती, अतेरिकी हे लोक घेऊ शकतात.
आपण कधी तरी बातमी वाचलीच असेल की पुढे दंगल चालू आहे. तेव्हा जेष्ठ नागरिक यांना दागिने काढायला सांगून दागिने लंपास करणारे चोर याबाबतची बातमी वाचलीच असेल. अशा वेळेस समोरच्या व्यक्तीला पोलीस असल्याचे खात्री पटावी म्हणून समोरच्या बाजूला पोलीस असे स्टिकर लावलेले असते.
त्याचबरोबर पोलीस पाटी लावलेले वाहन नो पार्किंग मध्ये बिनधास्त पार्किंग केले जातात.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खाकी गणवेश धारी पोलिस अधिकाऱ्याला सुद्धा त्यांच्या खाजगी गाडीवर पोलीस असे नाव किंवा गाडीमध्ये पोलीस असा फलक ठेवता येत नाही. आणि पोलीस चिन्हाचाही वापर करता येत नाही.
मोटार वाहन अधिनियम 2013 कलम 134(6) आणि मोटर वाहन कायदा कलम 77 प्रमाणे नाव किंवा चिन्ह यांचा गैरवापर केल्यास कारवाई करता येते.
याचप्रमाणे सरकारी कर्मचारी महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार अशी नावे खाजगी वाहनावर टाकू शकत नाहीत. आरटीओच्या नियमाप्रमाणे असे नाव टाकणे कायद्याने गुन्हा आहे. आशा गाड्यावर पोलीस प्रशासनासोबत आरटीओ विभाग सुद्धा कारवाई करू शकतो.





0 Comments