google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कौतुकास्पद... शशिकांत सुतकर यांच्याकडून स्व. भाई गणपतराव देशमुख यांचे रेखाटलेले चित्र डॉ.बाबासाहेब देशमुख यांना भेट

Breaking News

कौतुकास्पद... शशिकांत सुतकर यांच्याकडून स्व. भाई गणपतराव देशमुख यांचे रेखाटलेले चित्र डॉ.बाबासाहेब देशमुख यांना भेट

कौतुकास्पद... शशिकांत सुतकर यांच्याकडून स्व. भाई गणपतराव देशमुख यांचे


रेखाटलेले चित्र डॉ.बाबासाहेब देशमुख यांना भेट

सांगोला (प्रतिनिधी): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निजामपूर येथील शिक्षक श्री.शशिकांत उध्दव सुतकर यांनी स्व. भाई गणपतराव देशमुख यांचे रेखाटलेले चित्र डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांना काल गुरूवार दि. १८ मे रोजी भेट दिले.

स्व.भाई गणपतराव देशमुख यांचे हे रेखाटलेले चित्र पाहून डॉ.भाई बाबासाहेब देशमुख यांच्या चेहऱ्यावर आनंद पहावयास मिळाला. आपल्या अथक परिश्रमाने सुतकर यांनी आत्मसात केलेली त्यांची ही कला खरोखरच कौतुकास्पद असल्याचे सांगून अप्रतिम कलाकृतीबद्दल

 श्री. सुतकर सर यांचे डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांनी अभिनंदन केले. त्याचबरोबर अशाच उत्तमोत्तम कलाकृती निर्माण करण्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.यावेळी श्री.संजय काळे गुरुजी, श्री. आनंदा जगताप गुरुजी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments