ऊसाच्या फडात सरीला दारुची नशा चढल्याने व उन्हाचा तडाखा सहन न झाल्यामुळे
ते तेथेच झोपी गेले ते जागेवरुन उठलेच नाही माचणुर येथे दारुच्या नशेत एका तरूणाचा मृत्यू
मंगळवेढा : माचणूर शिवारातील ऊसाच्या फडात विष्णू सदाशिव पाटील (वय 52, रा.मुंढेवाडी) याचा दारुच्या नशेत झोपी गेलेल्या ठिकाणी मृत्यू झाल्याची घटना घडली असून याची पोलीसात नोंद झाली आहे.पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,
यातील मयत विष्णू पाटील हे सायंकाळी 7 च्यापुर्वी माचणूर शिवारातील ब्रम्हपुरी-मुंढेवाडी रस्त्यालगत असलेल्या संजय चरणू पाटील यांचे ऊसाच्या फडात सरीला दारुची नशा चढल्याने व उन्हाचा तडाखा सहन न झाल्यामुळे ते तेथेच झोपी गेले ते जागेवरुन उठलेच नाही.
प्रेताचा कुजलेला वास येत असल्याने येणार्या-जाणार्या नागरिकांनी पाहिले असता ते जागेवर मृत पावल्याचे दिसून आले. तात्काळ पोलीसांनी घटनास्थळी येवून पंचनामा करुन प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
याची खबर नागेश पाटील (रा.कळसई नगर मोहोळ) यांनी पोलीसात दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार महेश कोळी करत आहेत.


0 Comments