संतापजनक.. मी आता जगण्याची लायकीची राहिली नाही. म्हणत भाजप नेत्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल झालेल्या महिलेने
एरंडाच्या बिया खावुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न तिच्यावर सांगोला येथे उपचार सुरू आहेत.
त्यांना पुढे उपचारासाठी सोलापूर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे
आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती स्थिर; 'माझ्या मृत्यूला हे भाजप नेते जबाबदार...'
आज सकाळी निर्मला यादव हिने जवळा ता सांगोला येथील श्रीकांत देशमुख यांच्या देशमुख वस्ती येथील घरापुढे येवून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तिने श्रीकांत देशमुख यांचे वडीलांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र श्रीकांतचा भाऊ लालासाहेब देशमुख यांनी तुमचा नवरा येथे रहात नाही, जिथे रहातो तिकडे जावा म्हणून हाकलून दिले.
सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे (BJP) सोलापूरचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एका महिलेसोबतचा बेडरुमधील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या महिलेने आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या महिलेला सध्या सांगोल्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपच्या नेत्यांची नावे घेऊन बदनामी करते म्हणून सांगोल्यातील एका भाजपच्या पदाधिकाऱ्याने संबंधित महिलेच्या विरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित महिलेले आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे
आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी तिने केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, श्रीकांत देशमुख मी तुम्हाला शेवटचं बोलायचं आहे. मी आता जगण्याची लायकीची राहिली नाही. माझ्याजागी दुसरी मुलगी असती तर तिने हे पहिलचं केलं असतं. भाजपच्या लोकांना कळावं म्हणून मी हे पाऊल उचलत आहे. माझ्याकडे काही पर्याय नसल्यामुळे मी माझे जीवन संपवत आहे.
माझ्या मृत्यूला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, श्रीकांत देशमुख, त्यांचे दोन्ही भाऊ हे जबाबदार असतील. भाजपच्या माणसाला सांगून माझ्यावर एक केस केली आहे. त्यामुळे मला हे सर्व अनावर झाले आहे, त्यातून मी माझे जीवन संपवत आहे, असे सांगून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
व्हिडिओमध्ये ती म्हणत आहे की, मला कोणीही पाठिंबा दिलेला नाही. मदत मागितली, पण कोणीही मला मदत दिली नाही. युवा मोर्चामधील गणेश पांडे, दिवेकर, अमित शेलार, नील सोमय्या, दीपक ठाकूर, संतोष आव्हाड आणि इतर लोकांना माहिती आहे की मी कशी आहेत ते. आशिष शेलार आणि दिव्या ढोले यांनाही मी कशी आहे, ते माहिती आहे. माझा संसार होता. बीजेपीवाल्यांमुळे माझा संसार उद्ध्वस्त केला आहे.
निर्मलाने एरंडाच्या बिया खाल्या. तिच्यावर सांगोला येथे उपचार सुरू आहेत.
निर्मला यादव या महिलेने भाजपचा बडतर्फ जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख याच्याकडून प्रतारणा झाल्याचा आरोप सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओद्वारे करून गुरुवारी दुपारी आत्महत्येचा प्रयत्न केला. यासाठी निर्मलाने एरंडाच्या बिया खाल्या. तिच्यावर सांगोला येथे उपचार सुरू आहेत.
त्यानंतर त्या तेथून सरळ सांगोला पोलीस स्टेशन ला येवून मी एरंडीच्या बियाणे खाल्ल्याचे सांगितले पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी तिला तात्काळ उपचाराकरता सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्या ठिकाणी पोलीस अधिकारी तिची चौकशी करीत आहेत.
प्रकृती स्थिर
निर्मलाने एरंडाच्या 40 बिया खाल्या त्यामुळे रक्तदाब वाढला असून सध्या प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.




0 Comments