सांगोला शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यालगत असलेले अतिक्रमण तात्काळ काढावे -ॲड.रोहित सोनवणे
सांगोला शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यालगत असलेले अतिक्रमण तात्काळ काढावे -ॲड.रोहित सोनवणे
सांगोला /प्रतिनिधी(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
: सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी चौक पंडित जवाहरलाल नेहरू पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर महात्मा फुले या पुरुषांच्या पुतळ्यालगत गेल्या अनेक वर्षापासून हातगाडे व दुकाने यांनी अतिक्रमणे करून दुकाने थाटली आहेत. सदरील महापुरुषांचे पुतळे काही ठिकाणी दिसत सुद्धा नाहीत तसेच पुतळ्यालगतचे हातगाडे बारा
महिने त्याच ठिकाणी उभे असतात त्यामुळे परिसरात घाण देखील पहावयास मिळते. महापुरुषांचा पुतळा समाजात स्मृती व प्रेरणा देत असतात परंतु सांगोला शहरातील सर्वच महापुरुषांच्या पुतळ्यांना हातगाड्यांचा विळखा पडलेला असून सदरील बाब ही आपल्या समाजात अत्यंत अशोभनीय अशी आहे.
सांगोला शहरातील छ. शिवाजी महाराज चौक पं. जवाहरलाल नेहरू पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर महात्मा फुले या पुरुषांच्या पुतळ्यालगत असलेले सर्व हातगाडी व दुकाने यांचे अतिक्रमण तात्काळ कायमस्वरूपी काढून टाकून सदरील हात गाडी व्यवसायिकांनी पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण होऊ नये
याकरिता त्यांच्या व्यवसायाकरिता इतर योग्य ठिकाणी पुनर्वसन करून महापुरुषांच्या पुतळ्यांना हातगाड्यांचा पडलेला अतिक्रमणाचा विळखा काढून टाकण्याची तात्काळ कार्यवाही करावी. अशा मागणीचे निवेदन ॲड.रोहित सोनवणे यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिले आहे.


0 Comments