सांगोला विधवांनी निर्भयपणे समाजात वावरले पाहिजे राजश्री पाटील : सांगोल्यात विधवा व एकल महिलांचा मेळावा उत्साहात
सांगोला (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
गावोगावच्या विधवा व एकल महिलांनी पावरून खचून न जाता समाजामध्ये निर्भयपणे व स्वाभिमानाने वावरले पाहिजे.
पोलिस यंत्रणा गरज पडेल तिथे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असे मत उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांनी व्यक्त केले.
महात्मा फुले सभागृह सांगोला येथे अस्तित्व संस्थेने आयोजित केलेल्या विधवा व एकल महिलांच्या मेळाव्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बचत गटाच्या कार्यकर्त्या अश्विनी पाटील होत्या, तर स्वागताध्यक्ष म्हणून अॅड. सुनीता धनवडे होत्या.
याप्रसंगी वाणीचिंचाळे गावाच्या सरपंच प्रियांकागडहिरे, अध्यक्ष शहाजी गडहिरे, आरती जगधने, प्रा. तृप्ती बनसोडे, सुनीता गडहिरे, अर्चना खरचे, दीपाली भूसनर, प्रवीण सूर्यागंध, विशाल काटे, विजय धनावडे, संकल्प गहिरे, खंडेराव लांडगे उपस्थित होते.
राजश्री पाटील म्हणाल्या की, विधवा व एकल महिलांनी छोटे छोटे व्यवसाय केले पाहिजेत. मुला-मुलींना शिक्षण दिले पाहिजे. कुटुंबातीलसदस्यांशी समन्वयाने वागले पाहिजे, तर तुमची निश्चित प्रगती होईल.
प्रा. तृप्ती बनसोडे म्हणाल्या की, महिलांनी अंधश्रद्धा सोडून दिली पाहिजे. स्वतः वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेऊन स्वतःच्या क्षमता वाढवल्या पाहिजेत. मेळाव्यास सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील बहुसंख्य एकल व विधवा महिला उपस्थित होत्या.
0 Comments