सांगोला झीरो कर्मचाऱ्यांचा सुळसुळाट सांगोला उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाचे कामकाज 'राम भरोसे'
सांगोला : (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) सांगोला येथील भूमिअभिलेख
कार्यालयात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. या कार्यालयामध्ये कार्यरत असणारे अधिकारी मात्र झीरो कर्मचाऱ्यांच्या सान्यावर चालत असल्याचे चित्र दिसून येते..
या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर कामे पेंडिंग पडली आहेत. जी कामे प्रोसेसमध्ये आहेत, ती कामे करण्यासाठी
येथील कर्मचान्यांना चिरीमिरी दिल्याशिवाय कोणतीही फाईल पुढे जात नाही. जर दाम नाही मिळाला तर काम लगेच होत नाही' असे उत्तर या कार्यालयामधील झीरो
कर्मचाऱ्यांकडून ऐकावयास मिळते. त्यामुळे कामानिमित्त नागरिकांना वारंवार कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात.
वेळेत काम होत नसल्याने नागरिकांमध्ये या कार्यालयाविषयी मोठी नाराजी पसरली आहे. भूमिअभिलेख कार्यालयात नवीन खरेदी केलेल्या जमिनीची नोंद करणे,
जागेचा उतारा घेणे, प्रॉपर्टी कार्ड घेणे यासोबत सर्वात जास्त महत्त्वाचे म्हणजे या कार्यालयात जागेची मोजणी करून घेणे ही महत्त्वाचे कामे चालतात. या कार्यालयामध्ये राजरोसपणे खासगी एजंट (झीरो) यांची चांगली चलती
असल्याचे दिसून येते. कार्यालयातील कर्मचान्यांचे झीरो कर्मचान्यांशी रोजचेसंबंध असल्यामुळे कार्यालयाचे है, मालक झाले असल्याचे दिसून येते.
जमिनीची मोजणी करायची असेल तर शासनाकडून वेगळे दर ठरविले आहेत, परंतु या दरानुसार काम भरली तरी मोजणी होत नाही.
उलट त्यासाठी मोजणी अधिकान्यांना एजंट (झीरो) मार्फत मोठ्या प्रमाणात मलिदा द्यावा लागतो. जमिनीच्या बँक कर्जाची नोंद करायची असेल, तरीदेखील चिरीमिरी
घेतल्याशिवाय या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा पेन चालत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या कार्यालयाबाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून केली जात आहे.
0 Comments