google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी मुख्याधिकारी डॉ.सधीर गवळी ॲक्शन मोड वर

Breaking News

सांगोला शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी मुख्याधिकारी डॉ.सधीर गवळी ॲक्शन मोड वर

 सांगोला शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी मुख्याधिकारी डॉ.सधीर गवळी ॲक्शन मोड वर...


सांगोला शहरातील वंदेमातरम चौकातून अतिक्रमण काढण्यासाठी आज मुहूर्त लागला असून आज सकाळी 9 वाजल्यापासून अतिक्रमण काढण्यास JCB च्या साहाय्याने सुरुवात केली आहे. 

शहरातील अतिक्रमण बाबत गेल्या महिन्यापासून बातम्या आणि चर्चा होती कि अतिक्रमण कधी निघणार किंवा अतिक्रमण मुख्याधिकारी कधी काढणार किंवा काढणार काय? असे प्रश्न शहरातील नागरिकांमध्ये होते परंतु अतिक्रमण काढण्याची सुरुवात आजपासून झाली आहे.

डॉ.सुधीर गवळी मुख्याधिकाऱ्यांची दबंग कामगिरी, सांगोला शहरातील अतिक्रमणे केली भुईसपाट.अतिक्रमणाचा हॉटस्पॉट ठरलेला वंदे मातरम् चौक घेवू लागला मोकळा श्वास. 

सांगोला शहरांतील प्रमुख चौक आणि महापुरुषांच्या पुतळ्यानजीक मोठया दिमाखात बेकायदेशीरपणे व्यवसायाचा थाट मांडलेल्या आणि शहराच्या विद्रोपीकरणात भर घालणाऱ्या अतिक्रमणाला सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुधीर गवळी यांनी धडाकेबाज कामगिरी करीत अतिक्रमण काढले. 

गुरुवारी सकाळी आठ वाजलेपासून अतिक्रमणाचा हॉटस्पॉट ठरलेल्या वंदे मातरम् चौकापासून अतिक्रमण निर्मूलन मोहिमेस सुरूवात केली. यावेळी नगरपालिकेचा जवळपास दोनशे कर्मचाऱ्यांचा ताफा आणि काही पोलीस संरक्षणात सदर अतिक्रमण काढले. अतिक्रमण करतेवेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

सांगोला शहरातील अहिल्यादेवी होळकर पुतळ्यासमोरील पानटपऱ्या, चहाच्या टपऱ्या, हातगाडे, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पानटपऱ्या, नगरपालिकेसमोरील फळांचे गाडे, जवाहरलाल नेहरु परिसरातील हातगाडे, अंबिका मंदिरासमोरील हातगाडे,

 पान टपऱ्या, स्टेशन रोडवरील स्टेशनरीची दुकाने, रसवंतीची दुकाने, म. फुले चौकातील हातगाडे, भाजी मंडईची दुकाने आदि वाहतुकीस अडथळा ठरीत असलेली अतिक्रमणे काढल्याने सांगोला शहरातील रस्ते मोकळा श्वास घेवू लागल्याची भावना अनेक नागरिकांनी बोलून दाखविली.

काही अतिक्रमण धारकांना मात्र आपला हातगाडा आणि पान टपऱ्या काढताना अश्रू अनावर झाल्याचे पहावयास मिळाले.सांगोला शहराचे विदृपीकरण करणाऱ्यावर क्डक कारवाई: मुख्याधिकारी सुधीर गवळी सांगोला शहराने आतापर्यंत माझी वसुंधरा, आणि स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यात नावलौकीक मिळविला आहे.

 तोच नावलौकिक कायम टिकविण्यासाठी सर्वांनी नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, अतिक्रमण करून या पुढील काळात शहराचे विदृपीकरण करण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी सुधीर गवळी यांनी दिला आहे.

कही खुशी कही गम सांगोला शहरांतील प्रमुख रस्त्यांवरील आणि चौकातील अतिक्रमण काढत असताना काही लोकांना शहर अतिक्रमणातून मोकळा श्वास घेत असल्याने काहींच्या चेहऱ्यावर खुशी दिसून आली तर ज्या छोट्या व्यवसायांचा उदरनिर्वाहच रस्त्यावर बसून चालतो, त्यांच्या डोळ्यांत मात्रदुःखाचे अश्रू पहावयास मिळाले.

वंदे मातरम् चौकातील त्या अतिक्रमण धारकांची दबक्या आवाजात चर्चा. अतिक्रमणाचा हॉटस्पॉट ठरलेल्या वंदे मातरम् चौकातील त्या आठ पान टपऱ्या आणि हातगाडे टाकून संपूर्ण चौकाचे विदृपीकरण करणाऱ्या त्या अतिक्रमणधारकांची चर्चा चौकाचौकात ऐकावयास मिळाली.

Post a Comment

0 Comments