ब्रेकिंग न्यूज ! पी.बी. पाटील सरांची मृत्यूशी झुंज अपयशी,
वयाच्या 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
संत दामाजी कारखान्याचे विद्यमान संचालक व मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश भिवाजी पाटील उर्फ पी. बी. पाटील (सर) यांचे अपघातात उपचारादरम्यान आज निधन झाले आहे.
बुधवारी पहाटे पुण्याजवळ झालेल्या भीषण अपघाता झाला होता. उपचारादरम्यान निधन झाले असून पुणे येथून त्यांचे पार्थिव आज रात्री उशिरापर्यंत पंढरपुरात पोहचेल.उद्या सकाळी 7 वाजता पंढरपूर येथील त्यांच्या मनीषानगर मधील राहते निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर त्यांचे मूळ गावी मारापुर येथे सकाळी 8 च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पुण्यातून मंगळवेढ्याकडे परतत असताना उरळी कांचन जवळ मध्यरात्री दोन वाजता चहा पिण्यासाठी रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जात असताना सोलापूर वरून पुण्याकडे जात असणाऱ्या लक्झरीने दिलेल्या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते.अपघातामध्ये गंभीर दुखापत झाली असून उरळीकांचन येथील सिद्धिविनायक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत राजकीय संघर्ष करत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून कार्यरत आहेत. त्यांनी मतदारसंघ अध्यक्ष तसेच प्रांतिक सदस्य म्हणून काम पाहिले आहे. मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यात त्यांचा सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठा जनसंपर्क होता.


0 Comments