मोठी बातमी.. खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांची सिल्वर ओक वर घेतली दिपकआबांनी भेट.
सांगोला तालुक्यातील विविध मुद्द्यावर सविस्तर चर्चा संपन्न
सांगोला प्रतिनिधी,
आज दिनांक 30 /04/2023 वार रविवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांची मुंबईतील त्यांच्या सिल्वर ओक
या निवासस्थानी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष,मा.आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांनी भेट घेतली, या भेटीदरम्यान विविध मुद्द्यावर सविस्तर चर्चा संपन्न झाली.
सध्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर शेतीचे व फळबागाचे नुकसान झाले आहे त्याची नुकसान भरपाई शासनाकडून त्वरित मिळावी
या मागणीचे निवेदन व झालेल्या नुकसानाचा आढावा यावेळी साहेबांना देण्यात आला. तसेच अखिल भारतीय लोणारी समाजाच्या वतीने नुकतेच कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेले
आ.रवींद्र धंगेकर यांचा सत्कार समारंभ खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते होणार आहे त्या कार्यक्रमाच्या बाबतीत सविस्तर चर्चा या ठिकाणी दोघांमध्ये झाली.
अलीकडच्या काळामध्ये संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे तेल्या रोग व मर रोगामुळे या भागातील शेतकऱ्यांचे फळबागांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे हे नुकसान लक्षात घेता मेडशिंगी ता. सांगोला येथे
डॉ.अजयसिंह इंगवले यांनी "जैविकॉन राजलक्ष्मी ऑरगॅनिक" या संस्थेमार्फत माती,पाणी,देठ,पान,फुल परीक्षण रिसर्च सेंटरची उभारणी केली आहे.या रिसर्च सेंटरचे उद्घाटन खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते
करावयाच्या बाबतीत दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली व सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते मा.बाबुरावजी गायकवाड यांच्या अमृत महोत्सवी निमित्त खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते
त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा घेण्याच्या वेळेबाबतही सकारात्मक सविस्तर चर्चा यावेळी दोघांमध्ये झाली. याप्रसंगी खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सांगोला, पंढरपूर व सोलापूर दौऱ्याची दिनांक व वेळ दिपकआबांनी निश्चित केली.
0 Comments