धक्कादायक प्रकार.. मुलाला उसनवार दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी सुनेची हत्या
वडील आणि मुलात उसनवारीचे व्यवहार चालत असतात. कधी काळी त्याच्यातून कौटुंबीक वाद देखील उत्पन्न होतात.
पण मुलाला उसनवार दिलेल्या पैशासाठी सुनेला मारहाण केल्याचा आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना मालाड च्या मालवणी परिसरात घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
6 महिन्यांपूर्वी मुंबईतील मालाड येथील मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्कॅटर कॉलनीत राहणाऱ्या अकबर सय्यद यांनी
मुलगा आणि सून आयशा यांना घर बांधणीसाठी 10 लाख रुपये दिले होते. पण काही काळानंतर सासऱ्याने आपल्या सून आणि मुलाकडे पैशांसाठी तगादा सुरू केला.
मात्र पैसे न दिल्याने त्यांच्याशी सतत भांडण व्हायचे. नंतर हा वाद आणखीनच वाढतच गेला.आठवडाभरापूर्वीही पैशांवरून असाच वाद सुरू झाला होता. मात्र हे वाद काही वेळात निवळायचे.
गुरुवारी (27 एप्रिल) रोजी संध्याकाळी किरकोळ भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. आजेसासू रोकय्या सय्यद आणि तिची मुलगी गौरी सय्यद यांनी सून आयेशाचे केस पकडून तिला जमिनीवर पाडले. त्यामुळे सून आयेशा जखमी झाली.
तरीही तिला लाथा-बुक्क्यांनी तिच्या पोटावर आणि छातीवर इतके मारले. त्यानंतर तिच्या नवऱ्याने तिला उपचारांकरता रुग्णालयात दाखल केले.
पण उपचार सुरु होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. मालवणी पोलिसांनी सासरा अकबर सय्यद, त्याची आई रोकय्या सय्यद आणि बहीण गौरी सय्यद यांना मालवणी येथून अटक केली आहे.
अकबर सय्यद याच्यावर याआधीही गुन्हे दाखल होते. परंतु त्याची आई आणि बहीण यांच्यावर कोणतेही गुन्हे दाखल नाही आहेत. या तिन्ही आरोपींना तीन मेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
0 Comments