google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..परिवर्तन विकास आघाडीचा दारुण पराभव सांगोला मार्केट कमिटीवर शिवसेना, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, आनंद माने गटाचे सर्व उमेदवार विजयी.

Breaking News

मोठी बातमी..परिवर्तन विकास आघाडीचा दारुण पराभव सांगोला मार्केट कमिटीवर शिवसेना, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, आनंद माने गटाचे सर्व उमेदवार विजयी.


मोठी बातमी..परिवर्तन विकास आघाडीचा दारुण पराभव सांगोला मार्केट कमिटीवर

शिवसेना, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, आनंद माने गटाचे सर्व उमेदवार विजयी.

परिवर्तन विकास आघाडीचा दारुण पराभव

सांगोला(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)  बहुचर्चित आणि जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 16 जागेसाठी झालेल्या निवडणुकीत शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, आनंद माने गटाचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले आहेत. 

तर स्व. आमदार गणपतराव देशमुख विकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले. सांगोला पंचायत समिती बचत भवन येथे मतमोजणी पार पडली. 

या वेळी सांगोला शहर आणि तालुक्यातील अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध गावचे पुढारी, नागरिक उपस्थित होसांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 16 जागेसाठी तब्बल 44 जण रिंगणात होते. दोन सदस्य अगोदरच बिनविरोध झाले होते.

 यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत करांडे, आणि शेकाप आनंद माने गटाचे दगडु गावडे यांचा समावेश आहे. निवडून आलेल्या उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्याची अतिषबाजी केली.

 सदर मतमोजणी दरम्यान सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे: ग्रामपंचायत मतदार संघ अ) सर्वसाधारण) किशोर भानुदास शिंदे, 

समाधान शेषनारायन पाटील अनुसूचित जाती जमाती ग्रामपंचायत मतदार संघ: माणिकचंद वाघमारे,व्यापारी मतदार संघ: बागवान अमजद शब्बीर, बाबर रामचंद्र नारायण

सहकारी संस्था (महिला राखीव) शोभा विजय पवार, प्रमिला शिवाजी चौगुले

सहकारी संस्था मतदार संघ : भज. विजा. वि. मा. प्र. देवकते संतोष हरिदास

सहकारी संस्था मतदार संघ इतर मागास प्रवर्ग: दिपक बाळासो गोडसे.सहकारी संस्था मतदार संघ सर्वसाधारण: आलदर आबासो ज्ञानु, बाळासो निवृत्ती काटकर,

 विनायकराव अनंतराव कुलकर्णी, खरात अमोल मुरलीधर, पवार धनाजी गणपत, शिंदे हेमंतकुमार साहेबराव, सरगर विष्णू आदि उमेदवार निवडून आले आहेत.

सांगोला तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमुळे सत्तारूढ शेतकरी विकास आघाडीचे सर्व 16 उमेदवार विजय झालेआहेत.

 सत्ताधाऱ्यांच्या विरोधात 'स्व. गणपतराव देशमुख परिवर्तन महाविकास आघाडी' स्थापन करून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात दंड थोपटले होते. 

परंतू, तालुक्यातील सर्व प्रमुख नेत्यांची एकी झाल्यामुळे परिवर्तन आघाडीला अपेक्षित यश मिळू शकले नाही. परिवर्तन आघाडीचे सर्वच उमेदवार पराभूत झाले आहेत.

शेकाप पक्षाने कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप इत्यादी पक्षांना घेऊन जागा वाटप केले होते. 

परंतू, शेकाप पक्षातीलच माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांनी नाराजी व्यक्त करत बंड केले होते. 

त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड यांनी आपला उमेदवार अर्ज कायम ठेवत साथ दिली होती.

हमाल, तोलार व ग्रामपंचायतच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल गट या अगोदरच सत्ताधाऱ्यांच्या दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या.

 सत्ताधारी शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या शेतकरी विकास आघाडीने सर्व 18 जागा जिंकत आपला गड पक्का केला आहे

 तर परिवर्तनला अपेक्षित यश मिळू शकले नाही. त्यामुळे त्यांना धक्का बसला आहे.परिवर्तनच्या गायकवाडांचाही पराभव

परिवर्तन आघाडीमध्ये ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड सामील झाल्यामुळे या आघाडीला नवचैतन्य निर्माण झाले होते. त्यामुळे परिवर्तन आघाडी थोडेफार परिवर्तन घडवेल असे वाटत होते.

 परंतु या निवडणुकीमध्ये बाबुराव गायकवाड यांचाही निसटता पराभव झाल्याने संपूर्ण परिवर्तन आघाडीलाच दारुण पराभवास सामोरे जावे लागले.97 टक्के झाले मतदान

दोन जागा बिनविरोध निवडल्यानंतर राहिलेल्या 16 जागेसाठी 2 हजार 19 मतदारांपैकी 2 हजार 18 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 

त्यामुळे या निवडणुकीमध्ये एकूण 97 टक्के चुरशीने मतदान झाले.

विजा/विमाप्र) गटातून - संतोष हरिदास देवकते (792)

सहकारी संस्था मतदारसंघ (सर्वसाधारण) - आबासो ज्ञानू आलदर (753), बाळासो निवृत्ती काटकर 

(741), विनायकराव अनंतराव कुलकर्णी (754), 

अमोल मुरलीधर खरात (743), धनाजी गणपत पवार(755), हेमंतकुमार साहेबराव शिंदे (748), विष्णू नामदेव सरगर (748).

सहकारी संस्था इतर मागास प्रवर्ग - दीपक बाळासो गोडसे (789).

सहकारी संस्था मतदार संघ (महिला राखीव) - प्रमिला शिवाजी चौगुले (801), शोभा विजय पवार (818).

ग्रामपंचायत मतदार संघ (अनुसूचित जाती- जमाती) - माणिकचंद ताराचंद वाघमारे (509),

ग्रामपंचायत मतदार संघ (सर्वसाधारण) - समाधान शेषनारायण पाटील (389), किशोर भानुदास शिंदे (492).

- व्यापारी मतदारसंघ -

राम नारायण बाबर (158), अमजद शब्बीर बागवान (206).

हमाल तोलार गट - दगडु संभाजी गावडे (बिनविरोध)

आर्थिक दुर्बल गट - चंद्रकांत भीमराव कारंडे (बिनविरोध).

Post a Comment

0 Comments