महाराष्ट्रात आता 36 ऐवजी 58 जिल्हे होणार? ‘हे’ 22 जिल्हे प्रस्तावित, जाणून घ्या सविस्तर
राज्यात आता 36 ऐवजी 58 जिल्हे होऊ शकतात. कारण राज्यात आणखी 22 जिल्ह्यांची मागणी प्रस्तावित आहे.
1 मे 1960 रोजी 26 जिल्ह्यांचं महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. अनेक जिल्हे हे लोकसंख्या आणि आकाराच्यादृष्टीने मोठे होते.
मात्र प्रशासकीय कामासाटी नागरिकांची गैरसोय होऊ लागली. त्यानंतर आजपर्यंत राज्यात नवीन 10 जिल्ह्यांची भर पडून ते 36 जिल्हे झाले.
मात्र अजूनही गावातून येणाऱ्या नागरिकाला जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पूर्ण दिवस प्रवासात जातो. त्यामुळे आता आणखी 22 जिल्ह्यांची मागणी प्रस्तावित आहे.
कुलाबा ( आताचे रायगड), रत्नागिरी, बृहन्मुंबई, नाशिक, धुळे, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड परभणी,
धाराशिव, नांदेड, बुलढाणा, अहमदनगर, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जळगाव, भंडारा, चांदा ( आता चंद्रपूर) हे 26 जिल्हे नव्याने अस्तित्त्वात आलेल्या महाराष्ट्रात होते.
या 10 जिल्ह्यांची भर
या जिल्ह्यातून हा जिल्हा तयार
रत्नागिरी- सिंधुदुर्ग ( 1 मे 1981)
छत्रपती संभाजीनगर – जालना ( 1 मे 1981)
धाराशिव- लातूर ( 16 ऑगस्ट 1982)
चंद्रपूर- गडचिरोली ( 26 ऑगस्ट 1982)
बृहन्मुंबई- मुंबई उपनगर ( 1 ऑक्टोबर 1990)
अकोला- वाशिम ( 1 जुलै 1998)
धुळे- नंदुरबार ( 1 जुलै 1998)
परभणी – हिंगोली ( 1 मे 1999)
भंडारा- गोंदिया ( 1 मे 1999)
ठाणे -पालघर ( 1 ऑगस्ट 2014)
या जिल्ह्यांतून हे नवीन जिल्हे तयार होण्याची शक्यता
नाशिक- मालेगाव, कळवण
पालघर- जव्हार
ठाणे- मीरा भाईंदर, कल्याण
अहमदनगर- शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर
पुणे-शिवनेरी
रायगड- महाड
सातारा- माणदेश
रत्नागिरी- मानगड
बीड- अंबेजोगाई
लातूर- उदगीर
नांदेड- किनवट
जळगाव- भुसावळ
बुलडाणा-खामगाव
अमरावती-अचलपूर
यवतमाळ- पुसद
भंडारा- साकोली
चंद्रपूर- चिमूर
गडचिरोली- अहेरी
0 Comments