google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दुर्दैवी घटना ; लेकराला वाचवण्यासाठी पोहता येत नसतानाही बापाने मारली उडी, …दोघांचाही बुडून मृत्यू

Breaking News

दुर्दैवी घटना ; लेकराला वाचवण्यासाठी पोहता येत नसतानाही बापाने मारली उडी, …दोघांचाही बुडून मृत्यू

 दुर्दैवी घटना ; लेकराला वाचवण्यासाठी पोहता येत

नसतानाही बापाने मारली उडी, …दोघांचाही बुडून मृत्यू 

चिमुकल्याची आई वेळेत मदत मिळाल्याने वाचली.

पुणे जिल्ह्यातल्या जांबुत (ता शिरूर) येथील बापलेकाचा स्विमिंग टँकमध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. चांगरबाबा कृषी पर्यटन केंद्रामधे कृषी केंद्राच्या मालकाच्या मुलाचा आणि नातवाचा स्विमिंग टँक मधे बुडून मृत्यु झाला. 

तर त्या दोघांना वाचवण्यासाठी गेलेली चिमुकल्याची आई वेळेत मदत मिळाल्याने वाचलीय.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सत्यवान शिवाजी गाजरे व दीड वर्षाचा मुलगा राजवंश या दोघांचा मृत्यु झाला. बेल्हे जेजुरी महामार्गावर जांबुत ( पंचतळे ) येथे शिवाजी गाजरे यांचे हॉटेल व कृषी पर्यटन केंद्र आहे. 

रविवारी 30 मे रोजी सांयकाळी 4च्या सुमारास येथे त्यांचा मुलगा सत्यवान शिवाजी गाजरे ( वय 28 ) सुन स्नेहल सत्यवान गाजरे ( वय 25 ) तसेच नातु राजवंश 

( वय दीड वर्षे ) हे हॉटेल परीसरातच होते. येथे परीसरात स्विमिंग टॅक असुन सुन व मुलगा कामात असताना राजवंश खेळत खेळत स्विमिंग टँक मधे जाऊन टाकीत पडला.

राजहंसला वाचविण्यासाठी सत्यवान यांनी टँककडे धावत जाऊन त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. 

मात्र सत्यवान यांनाही पोहता येत नव्हते, त्यामुळे तेही बुडू लागले. त्यावेळी सत्यवान यांची पत्नी स्नेहलनेही पाण्यात उडी मारली. मात्र स्नेहललाही पोहता येत नसल्यांने ती सुद्धा पाण्यात बुडू लागली. 

सत्यवानचा भाऊ किरण येथील आरडा ओरडा ऐकू आल्याने धावत गेला. यावेळी त्याला स्नेहला वाचविण्यात यश आले.मात्र भाऊ आणि भावाच्या मुलाला वाचवण्यात यश आले नाही.

सत्यवान व राजवंशला त्यांनी वर काढुन तत्काळ जांबुत येथे खाजगी दवाखाण्यात नेले. तिथून दोघांनाही आळे येथे नेले. 

मात्र उपचाराआधीच दोघांचा मृत्यु झाला होता. त्यांच्यावर रात्री उशीरा जांबुत येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments