google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी! वाहन चालकांसाठी महत्त्वाची अपडेट

Breaking News

मोठी बातमी! वाहन चालकांसाठी महत्त्वाची अपडेट

 मोठी बातमी! वाहन चालकांसाठी महत्त्वाची अपडेट

सोलापूरसह व अन्य भागात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर मोठी कारवाई केली जात आहे. वाहतुकीचे नियम न पडल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाहतूक शाखेने यामुळेच आपली मोहीम तीव्र केली आहे.

 लायसन्स नसणे, पीयूसी नसणे, एका गाडीवर तिघे जण जाणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे व अन्य कारणासाठी वाहतूक शाखेने आपली तपासणी मोहीम आणखी तीव्र केली आहे.

 त्यातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने एक नवा नियम जारी केला आहे. आता पीयूसी नसल्यास तुम्हाला जबर दंड भरावा लागणार आहे. पीयूसी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी केंद्रे आहेत.

 मात्र याबाबत वाहन चालक फारसे गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. यामुळेच आता पीयूसी दंडात मोठी वाढ करण्यात आली आहे. यासाठी पूर्वी केवळ पन्नास रुपये दंड आकारले जायचे. 

मात्र आता नव्या नियमानुसार हे प्रमाणपत्र नसल्यास तुम्हाला सुमारे दोन ते चार हजार रुपयांचा चटका बसू शकणार आहे. यामुळे वाहन चालकांनी पीयूसी प्रमाणपत्र सोबत बाळगावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments