ब्रेकिंग न्यूज... शरद पवारांच्या निर्णयाला जेष्ठ नेत्यांचा विरोध,
मात्र अजितदादांनी मांडली वेगळी भूमिका; म्हणाले "आता नवीन अध्यक्ष..."
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरतून पायउतार होण्याची घोषणा शरद पवार यांनी केली आहे. 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यावेळी त्यांनी घोषणा केली.
यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला. शरद पवार यांच्या निर्णयामुळे जेष्ठ नेत्यांचा देखील कंठ दाटून आल्याचं पहायला मिळालं.
आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपद सोडणार असून यापुढे कोणतीही निवडणूक लढणार नसल्याचा देखील शरद पवार यांनी घोषित केल आहे.
पवार यांनीही घोषणा करतात सर्व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत आपण हे पद सोडू नये अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.
शरद पवार निर्णय मागे घेईपर्यंत सभागृह न सोडण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. सुनील तटकरे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन सद्या सुरू आहे.
यावेळी जेष्ठ कार्यकर्त्यांना नेत्यांना अश्रू अनावर झाल्याचं देखील दिसून आल, पवारांनी निर्णय मागे घेण्यासाठी साकडे घालण्यात आले.
दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र वेगळी भूमिका मांडत शरद पवार यांचा निर्णय मान्य करण्याचं सर्वांना आवाहन केलं. आगामी काळात नवीन अध्यक्षाला पवार साहेबांचे मार्गदर्शन मिळेल, असं अजित पवार म्हणाले.


0 Comments