पंढरपूरच्या विठ्ठलावर अनोखी भक्ती, भाविकाकडून
विठुरायाच्या चरणी पावणे दोन किलो सोन्याचे दागिणे अर्पण
जालना : महाराष्ट्र, कर्नाटकसह तेलंगाणा, आंध्र प्रदेशातील भाविक पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात.
भाविक मोठ्या प्रमाणात दान देखील करत असतात. मोहिनी एकादशी निमित्त जालन्याच्या भक्ताकडून विठुरायासाठी पावणे दोन किलो सोन्याचे दागिणे अर्पण करण्यात आले आहेत.
विठ्ठलाच्या भक्तीपोटी जालन्यातील एक भाविकाकडून दुसऱ्यांदा विठूरायाला मोहिनी एकादशीच्या दिवशी सोन्याचे धोतर,कंठी आणि सोन्याचा चंदनाचा हार असे पावणे दोन किलोच्या दागिन्यांचे दान देण्यात आले आहेत.
यापूर्वी जालनाच्या याच भाविकाने एक कोटी 80 लाख रुपयाचे दान विठ्ठलाच्या पायी दिले होते.
भक्तिरसात रंगून गेलेल्या भक्तांसाठी विठुरायााचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
आपल्या उत्पन्नातील, कमाईतून काही भाग विठुरायाच्या चरणी ठेवून भाविक नतमस्तक होतात. काल मोहिनी एकादशीच्या निमित्ताने आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर विठुरायाच्या परम भक्तांनी दुसऱ्यांदा कोट्यवधी रुपयांचे दान दिले आहे
मोहिनी एकादशीच्या मुहूर्तावर विठोबाच्या चरणी पावणे दोन किलो वजनाचे सोन्याच्या धोतर, तसेच नाजूक बनावटीचा
चंदन हार आणि सुंदर कलाकुसर असणारा कंठा असे सव्वा कोटी रुपये किमतीचे दागिने जालन्यातील भाविकाने दान दिले आहे. कलाकुसरीचे सुंदर असणारे हे दागिने काल या भाविकाने मंदिर समिती कडे सोपवले.
यानंतर सदर दागिने विठुरायाच्या चरणी अर्पण केले गेले. मात्र, विठुरायाला कोट्यवधींचं दान देणाऱ्या भाविकानं त्यांच्या नावाला प्रसिद्धी देऊ नये, अशी विनंती केली आहे.


0 Comments