google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर पोलिसांच्या 'तेजस्वी' ऑपरेशन परिवर्तनचा देशात डंका! पंतप्रधानांच्या हस्ते SP सरदेशपांडेंचा सन्मान

Breaking News

सोलापूर पोलिसांच्या 'तेजस्वी' ऑपरेशन परिवर्तनचा देशात डंका! पंतप्रधानांच्या हस्ते SP सरदेशपांडेंचा सन्मान

 सोलापूर पोलिसांच्या 'तेजस्वी' ऑपरेशन परिवर्तनचा देशात डंका! पंतप्रधानांच्या हस्ते SP सरदेशपांडेंचा सन्मान

सोलापूर : जिल्ह्यातील ५६ गावातील विशेषत: तांड्यावरील शेकडो लोक अवैध हातभट्टी दारूमध्ये गुंतले होते. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी प्रत्येक गाव अधिकाऱ्यांना दत्तक

 देत दर दोन दिवसाला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी छापेमारी, समुपदेशन, पुनर्वसन व जागृती या चतु:सूत्रीवर आधारित 'ऑपरेशन परिवर्तन' राबवले.त्यातून ७२६ जणांनी अवैध व्यवसाय सोडून दिला. 

केंद्र सरकारने त्या उपक्रमाला 'पीएम ॲवॉर्ड फॉर एक्सलेन्स' पुरस्कार दिला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचा शुक्रवारी दिल्लीत पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

सोलापूर शहराजवळील मुळेगाव तांडा हा वर्षानुवर्षे अवैध हातभट्टी दारू निर्मितीचे केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. अक्कलकोट, दक्षिण व उत्तर सोलापूर, मोहोळसह अन्य तालुक्यांमधील 

तांड्यावर कमी-अधिक प्रमाणात हातभट्टीची अवैधरित्या निर्मिती व विक्री सुरुच होती. या पार्श्वभूमीवर तत्कालीन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये 'ऑपरेशन परिवर्तन' राबविण्याचा निर्णय घेतला.

सुरवातीला ज्या तांड्यावरील चार-पाच कुटुंब या अवैध व्यवसायात गुंतले होते, ते तात्काळ परावर्तित झाले. 

पण, मुळेगाव तांड्यासह अन्य मोठ्या तांड्यांवरही पोलिसांनी विशेष वॉच ठेवला. पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक, 

पोलिस उपअधीक्षकांसह वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना गावे (तांडे) दत्तक देऊन तेथील जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. 

कारवाई करताना सापडलेल्यांसह त्यांच्या कुटुंबियांचेही समुपदेशन करण्यात आले.

तांड्यांवर जाऊन पोलिसांनी जनजागृती केली. पण, कमी वेळेत जास्त पैसा मिळणारा हा व्यवसाय सोडणाऱ्यांचे पुनर्वसन झाल्याशिवाय 

हा अवैध व्यवसाय बंद होणार नसल्याची जाण ठेवून पोलिसांनी त्या लोकांसाठी रोजगार मेळावे घेतले. 

त्यांना बॅंकांकडून अर्थसहाय देखील मिळवून दिले. आता ते लोक समाजमान्य व्यवसाय करीत आहेत. 

त्या लोकांसह अवैध हातभट्ट्यांवर सध्या पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा वॉच कायम आहे.

'गोरमाटी ब्रॅण्ड'ला दिली चालना

बंजारा समाजातील प्राचिन कला काळाच्या ओघात लोप पावत होती.

 त्या महिलांना ग्रामीण पोलिसांनी प्रोत्साहन देत साड्यांवरील नक्षीकाम, वॉलमार्ट, ज्वेलरी, अशी विविध उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण दिले.

 त्याचे प्रदर्शनही भरवले आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांसह जिल्ह्यातील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या वस्तूंची खरेदी करून त्यांना प्रोत्साहित केले. 

सध्या त्यांचा 'गोरमाटी आर्ट ब्रॅण्ड' ग्राहकांसाठी ऑनलाईन देखील उपलब्ध आहे.

'ऑपरेशन परिवर्तन' अधिक जोमाने सुरु राहील तत्कालीन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या 'ऑपरेशन परिवर्तन'ला 

ग्रामीण पोलिस दलातील सर्वच पोलिस अधिकारी व अंमलदारांच्या मेहनतीमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'पीएम अॅवॉर्ड फॉर एक्सलेन्स' पुरस्कार मिळाला. 

पुरस्काराने प्रेरित ग्रामीण पोलिस तो उपक्रम अधिक जोमाने तसाच पुढे सुरु ठेवतील.

- शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

Post a Comment

0 Comments