सांगोला खिलारवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
खिलारवाडी (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
सांगोला तालुक्यातील मौजे खिलारवाडी येथे पहिल्यांदाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यामध्ये कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भीम गीताचा कार्यक्रम सोलापूर येथील आनंद शिंदे यांचे पटशिष्य रमेश कांबळे यांचा भीम गीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
तर दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील शाहीर सुभाष गोरे यांचा पोवाडा चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला खिलारवाडी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी उपस्थिती लावली होती
या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार शहाजी बापू पाटील ,माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाबासाहेब देशमुख, भीमशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय बनसोडे,
सांगोला नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अरुण बिले, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे तसेच खिलारवाडी येथील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजक भाग्यश्री ब्रास बँड अँड इव्हेंट पुण्याचे उद्योगपती खिलारवाडी चे सुपुत्र दाजी उर्फ राज सोनापा शिंदे व महादेव शिंदे वंचित बहुजन
आघाडीचे जिल्हा संघटक यांच्या वतीने या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी खिलारवाडी येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दाखवून सहकार्य केले.
यावेळी खिलारवाडी चे सरपंच शरद हिप्परकर, गायगव्हाणचे सरपंच बाळासाहेब कांबळे, नवल गाडे, समाधान बागल ,बालाजी शिंदे ,नितीन शिंदे ,विकास इंगोले ,प्राध्यापक काळेल सर,
सागर भादुले, चंद्रकांत बागल, भूषण बागल ,बालाजी खिलारे, मानाजी खिलारे ,राम शिंदे, देवा खांडेकर ,सचिन कांबळे (गुरुजी) ,दिनेश शिंदे, महेंद्र कांबळे, सुशांत वाघमारे यासह नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.
0 Comments