सांगोला रमजान ईद निमित्त सांगोला तालुका व शहर काँग्रेस कमिटी
यांच्या वतीने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.
सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
सांगोला शहरातील ईदगाह मैदान येथे रमजान ईद निमित्त सांगोला तालुक्यातील तमाम मुस्लिम बांधवांना सांगोला तालुका व शहर काँग्रेस कमिटी , जिल्हा पदाधिकारी यांच्या वतीने गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
सांगोला शहरातील नव्याने बांधलेल्या ईदगाह येथे तालुक्यातील व शहरातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या प्रमाणामध्ये नमाज पठण करण्यासाठी उपस्थित राहिले होते.
यावेळी समस्त मुस्लिम बांधवांनी नमाज आदा केले .त्यानंतर सांगोला तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष अभिषेक कांबळे
,शहराध्यक्ष तोहीद मुल्ला, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष मैनाताई बनसोडे, शहर उपाध्यक्ष-पांडुरंग माने, युवक काँग्रेसचे नेते गणेश लोखंडे यासह पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments