ब्रेकिंग न्यूज - D.Ed ( डी.एड)होणार बंद..महाराष्ट्र राज्य सरकारचा मोठा निर्णय वाचा पर्यायी व्यवस्था काय असेल
डीएडचं (डिप्लोमा इन एज्युकेशन) शिक्षण बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता डीएड बंद होणार आहे. शिक्षक होण्यासाठी गरजेची असणारी डी एड ही पदवी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेत बदलली आहे.
नव्या शिक्षण धोरणांनुसार याबाबत केंद्र सरकारने अगोद निर्णय घेतलेला होता.
केंद्र सरकारच्या मागोमाग डीएड बंद करण्याचा निर्णय आता राज्य सरकारने देखील घेतलेला आहे.व शिक्षक होण्याच्या पात्रतेसाठी आता नवीन धोरणात्मक अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे.
यामध्ये चार वर्षांची बीएडचीच पदवी घेऊनच आता शिक्षक होता येणार आहे.आता जिल्हा परिषद शाळा आणि इतर शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी इयत्ता बारावीनंतर चार वर्षांची बीएड पदवी घेणं अनिवार्य राहणार आहे.
तर नव्या शैक्षणिक धोरणांच्यानुसार बीएडच्या शिक्षणातही विषयानुसार अभ्यासक्रम असणार आहे. केंद्र सरकारचे धोरण आता राज्यातही नव्या शैक्षणिक धोरणांनुसार अंमलबजावणी करण्यात येण्याची शक्यता आहे.
नव्या शैक्षणिक धोरणांनुसार, आता बीएड बंद होणार आहे. तसेच पीजी केलेल्या विद्यार्थ्यांना एका वर्षात डीएड करता येणार आहे.
पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी बीएडचं शिक्षण असेल. तर बारावीनंतर ही डीग्री मिळवण्यासाठी चार वर्षांचं शिक्षण घ्यावं लागेल. विशेष म्हणजे कोणत्या विषयाचं शिक्षक व्हायचं यावरुन विषय निवड असेल.
0 Comments