google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दुर्दैवी घटना.. लग्नाची हळद निघण्यापूर्वीच नवदाम्पत्यावर काळाचा घाला

Breaking News

दुर्दैवी घटना.. लग्नाची हळद निघण्यापूर्वीच नवदाम्पत्यावर काळाचा घाला

दुर्दैवी घटना.. लग्नाची हळद निघण्यापूर्वीच

नवदाम्पत्यावर काळाचा घाला

कोल्हापूर : नियतीचा डाव कधी किती क्रूर आणि भयावह अंत करणारा असतो याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. 

अवघ्या 15 दिवसांपूर्वी विवाहबद्ध होऊन सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या जोडप्याचा देवदर्शन करुन येत असताना झालेल्या भीषण कार अपघातात जागीच अंत झाला. दुर्दैवाचा फेरा इतक्यावरच न थांबता मुलाचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत.

इंद्रजित मोहन ढमणगे (वय २९) आणि कल्याणी इंद्रजित ढमणगे (वय २४ वर्षे दोघे रा. किसाननगर, इस्लामपूर, जि. सांगली) अशी मृत झालेल्या नवविवाहित दाम्पत्याचे नाव आहे. 

कल्याणी यांचे माहेर कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी आहे. तर इंद्रजित हा मुंबईमध्ये टीसीएस कंपनीत कार्यरत होता. जखमी असलेल्या वडील मोहन आणि आई मीनाक्षी यांच्यावर इस्लामपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या घटनेची माहिती अशी की, नवदाम्पत्य इंद्रजित आणि कल्याणी कर्नाटक राज्यातील शाकांभरी देवीच्या दर्शनाला गेले होते.

 सोबत इंद्रजितचे आई-वडीलही होते. इंद्रजित आणि कल्याणी यांचा विवाह 18 मार्च रोजी झाला होता. देवदर्शन झाल्यानंतर परत येत असताना (गुर्लापूर ता. मुडलंगी) जवळ हलूर येथे आले 

असताना समोरुन येणाऱ्या ट्रकला त्यांच्या कारची भीषण धडक झाली. या धडकेमध्ये इंद्रजित आणि कल्याणी यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच ठार झाल्या.

 कारमध्ये सोबत असलेल्या इंद्रजितचे वडील मोहन आणि आई मीनाक्षी हे गंभीर जखमी झाले. मोहन यांच्या हाताला दुखापत झाली असून, डोक्याला गंभीर जखम झाली आहे. त्यांची पत्नी मीनाक्षी यांच्याही डोक्याला गंभीर जखम झाली आहे.

कर्नाटकमधील हलूरजवळील जत-जांबोटी महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये देवदर्शनाला गेलेले कारमधील नवदाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आणि दोघेजण जखमी झाले. 

हा अपघात शनिवारी (१ एप्रिल) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला. मृत इंद्रजीत यांचे वडील मोहन (वय ६५ वर्षे) आणि आई मिनाक्षी (वय ५९ वर्षे) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Post a Comment

0 Comments