सांगोला बाजार समिती निवडणूक; १८ जागांसाठी १३६ अर्ज ६ एप्रिल
रोजी अर्जांची छाननी २० एप्रिल रोजी चित्र स्पष्ट होणार
सांगोला तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आज अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी १८१३८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून अर्ज दाखल करणवादी शिवसेना शिंदे गट भाजपा रिपाई आठवले गटाच्या गटाच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
सहकारी संस्था मतदारसंघात अकरा जागा असून सर्वसाधारण सात जागेसाठी ५६ अर्ज महिला राखीव दोन जागेसाठी दहा
अर्ज इतर मागासवर्गीय एक जागेसाठी पाच अर्ज, तर विमुक्त जाती व भटकाजमातीच्या एका जागेसाठी दहा अर्ज, दाखल झाले आहेत या मतदारसंघात सहकारी सोसायटीच्या संचालक है मतदार आहेत.
ग्रामपंचायत मतदार संघात चार जागा असून सर्वसाधारण दोन जागेसाठी २८ अर्ज, अनुसूचित जमाती एक जागेसाठी दहा अर्ज, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील एका जागेसाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत
या मतदारसंघात तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. व्यापारी मतदारसंघातून दोन जागेसाठी ११ अर्ज तर हमाल तोलारी गटातून एका जागेसाठी तीन अर्ज दाखल झाले
असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद दूरगुडे यांनी दिली.आज अर्ज दाखल करणे प्रसंगी रिपाई आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे तालुका खंडू सातपुते यांच्या उपस्थितीत हलगीच्या निनादात चार अर्ज दाखल केले आहेत
तसेच माजी नगरसेवक सुरज बनसोडे यांनी दोन गटात अर्ज दाखल केले आहेत शेकापचे माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांनी स्वतंत्ररित्या अठरा अर्ज दाखल करण्यात आले असून शेकाप मध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे
त्याचा परिणाम शेकापचर होण्याची शक्यता आहे तसेच भाजराचे नेते नागेश जोशी वसंत सुपेकर संभाजी आदर यांनीही स्वतंत्र अर्ज दाखल केल्याने भाजपा वही खोरी दिसून येत आहे.
0 Comments