धक्कादायक.. जिगरी मित्रांनी एकाच झाडाला घेतला
गळफास, फांदी तुटली पण..... कोल्हापुरातील घटना
कोल्हापूर : हातकलंगले तालुक्यातील जुने पारगाव येथे मनाला चटका लावणारी घटना घडली आहे.
दोन मित्रांनी एकाच वेळी एकाच झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
दोघांच्या वजनाने झाडाची फांदी तुटली. मात्र, तोपर्यंत दोघांचाही जीव गेला होता. दरम्यान, आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकले नसून याबाबत वडगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.या घटनेनंतर परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगले तालुक्यातील जुने पारगाव येथील बिरदेव वसाहतीमधील दोन मित्र विनायक शिवाजी पाटील (वय 40) व त्याचा मित्र बाबासो हिंदुराव मोरे (वय 45) यांनी आज एकाचवेळी एकाच झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.
नवे पारगाव येथील तात्यासाहेब कोरे सैनिक शाळेच्या पाठीमागील झाडीमध्ये हा प्रकार घडला. विनायक पाटीलचा ट्रक व्यवसाय आहे.
तर बाबासो मोरे हे शेतकरी आहेत. विनायक पाटीलच्या पाठीमागे आई, भाऊ, पत्नी आणि एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. तर बाबासो मोरे याच्या पाठीमागे आईवडील, पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.दोघेही जुने पारगाव येथील बिरदेव वसाहतीमध्ये रहात होते.
दोघांची चांगली मैत्री होती. कायम एकमेकांच्या दुःखात सहभागी होत. आज सकाळपासून ते दोघे एकत्रच फिरत होते. दुपारच्या वेळेस या दोघांनी मोटर सायकलवरून सैनिक शाळेच्या मागील झाडीत जाऊन एकाच झाडाला दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.
0 Comments