google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील आगलावेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अक्षय आगलावे तर उपसरपंचपदी राष्ट्रवादीच्या पूजा मोहिते यांची बिनविरोध निवड

Breaking News

सांगोला तालुक्यातील आगलावेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अक्षय आगलावे तर उपसरपंचपदी राष्ट्रवादीच्या पूजा मोहिते यांची बिनविरोध निवड

सांगोला तालुक्यातील आगलावेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अक्षय आगलावे

तर उपसरपंचपदी राष्ट्रवादीच्या पूजा मोहिते यांची बिनविरोध निवड

सांगोला : तालुका प्रतिनिधी आगलावेवाडी ता. सांगोला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अक्षय चंद्रकांत आगलावे तर उपसरपंचपदी  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पूजा अण्णासाहेब मोहिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडीनंतर नवनियुक्त सरपंच उपसरपंच यांनी ह भ प शारदादेवी ( काकी ) साळुंखे -पाटील यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून गुलालाची मुक्त उधळण करीत जल्लोष केला. 

आगलावेवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शांताबाई हाके व उपसरपंच सूर्यकांत कोळेकर यांचा कार्यकाल संपल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे - पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडलाधिकारी विजयकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली

 रिक्त झालेल्या सरपंच उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत सदस्यांची सभा घेण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी  यांनी त्यांची सरपंच पदी

 अक्षय आगलावे तर उपसरपंच पदी पूजा मोहीते यांची  निवड झाल्याचे जाहीर केले. निवडी प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य बाळू कोळेकर , सूर्यकांत कोळेकर , गुंडा माळी , वैशाली आगलावे , कल्पना काशीद , 

शांताबाई हाके, मंदाकिनी खांडेकर उपस्थित होते.निवडीनंतर जवळा येथे यशराजे साळुंखे पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करून भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments