सांगोला विज्ञान महाविद्यालयात म. बसवेश्वर महाराज जयंती साजरी
सांगोला-- विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी,
प्रमुख पाहुणे प्रा. सौ. मनीषा जाधव प्रा .जयाराम वरे कु. प्रियंका गावडे ,श्री दौंडे मालक, प्रा. दीपक रिटे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. सौ. मनीषा जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्पष्ट केले की ,महात्मा बसवेश्वर हे
परिवर्तनवादी सत्पुरुष, सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक व वर्ग विरहित समाज निर्माते होते अध्यात्मिक, वैचारिक परिवर्तन घडवण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.
अशा परिवर्तनवादी महात्मा बसवेश्वर यांचे विचार अंगीकारणे आत्मसात करणे काळाची गरज आहे.
तेव्हा समाजातील सर्व वर्गाने जाती विरहित समाज रचना निर्माण केली पाहिजे व माणूस म्हणून जगले पाहिजे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्पष्ट केले की, दास्यत्व, वर्णभेद, जातीभेद, कुप्रथा,
मनुवादी प्रवृत्तीत जखडलेल्या समाजाला थेट आव्हान देऊन समाज सुधारणेचे महान कार्य महात्मा बसवेश्वर यांनी केले
तेव्हा अशा विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी जगले पाहिजे व इतरांनाही जगवले पाहिजे असा आदर्शवाद विद्यार्थ्यांसमोर त्यांनी उभा केला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक रिटे यांनी केले तर आभार प्रा. जयराम वरे यांनी मानले
कार्यक्रमाला श्री दत्तात्रेय भजनावळे, श्री सिद्धेश्वर मेटकरी, श्री दौंडे मालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments