google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 "गे ऍप" मुळे झाला "गेम" मित्रासोबत समलिंगी तर त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध.शेवट खून

Breaking News

"गे ऍप" मुळे झाला "गेम" मित्रासोबत समलिंगी तर त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध.शेवट खून

 "गे ऍप" मुळे झाला "गेम" मित्रासोबत समलिंगी तर त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध.शेवट खून 

जालना; बँकेची वसुली करणाऱ्या प्रदीप भाऊराव कायंदे वय वर्ष 40 यांचा दिनांक 8 एप्रिल रोजी मंठा शहरात खून झाला होता.

 दरम्यान या खुनाचा तपास लावण्यात मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना यश आलेआहे. प्रदीप कायंदे यांचा खून” गे ऍप”च्या माध्यमातून त्यांचा मित्र सोपान बोराडे

 यांच्यासोबत समलिंगी संबंध आणि त्याच्याच पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्यामुळे झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, आणि आरोपींनी तशी कबूलही दिली आहे.

देऊळगाव राजा परिसरात राहणारे प्रदीप भाऊराव कायंदे हे जालना शहरात एका बँकेची वसुली करत असत,

 ते रोज जालना ते देऊळगाव राजा जाणे- येणे करायचे, दरम्यान सात तारखेला ते जालन्याहून देऊळगाव राजाला न जाता मंठा येथे पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात डाटा

 एन्ट्री करणारे ऑपरेटर त्यांचे मित्र सोपान बोराडे यांच्याकडे गेले. या दोघांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून “गे ऍप” द्वारे मैत्री झालेली होती, आणि दोघांमध्ये समलिंगी संबंधही होते. 

या समलिंगी संबंधाचा फायदा घेत प्रदीप कायंदे यांचे सोपान बोराडे यांच्या पत्नी सोबत अनैतिक संबंध जुळले. सात तारखेला प्रदीप कायंदे हे बोराडे यांच्या मंठा येथील शांतीनगर येथील घरी गेले आणि मुक्काम केला.

दरम्यानच्या काळात दोघांमध्ये भांडण झाले आणि सोपान बोराडे तसेच त्यांचे होमगार्ड असलेले भाऊ प्रकाश बोराडे यांनी इतरांच्या मदतीने प्रदीप कायंदे यांना मारहाण केली आणि त्यांचा खून केला. 

त्यानंतर प्रदीप कायंदे यांचे प्रेत बाजार समिती परिसरात आणून टाकले. आठ तारखेला ही घटना उघडकीस आल्यानंतर मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी या प्रकरणाचा अवघ्या सहा तासात छडा लावला

 आणि पुरावे शोधण्यासाठी त्यांनी मोबाईल रेकॉर्डिंग, छायाचित्र ,व्हिडिओ चित्रीकरण ,अशा प्रकारचे भक्कम पुरावे जमा केले.

दरम्यान या खुनाची सोपान बोराडे आणि प्रकाश बोराडे यांनी कबुली दिली आहे. 

पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्यासह त्यांचे सहकारी आसमान शिंदे, संतोष बनकर, मांगीलाल राठोड, दीपक आडे ,शाम गायके, प्रशांत काळे, सुनील इगल आदींचा समावेश होता.

Post a Comment

0 Comments