google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा हवालदिल...!!!

Breaking News

सांगोला शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा हवालदिल...!!!

सांगोला शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात

पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा हवालदिल...!!!

कोळे/ वाहिद...(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)

दिवसभर उन्हाचा तडाका बसत बसताना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मोठया प्रमाणात सोसाट्याच्या वाऱ्यास विजांच्या कडकड्या सोबत पावसाची दमदार सुरुवात होते.गेले तीन दिवसापासून सांगोला शहरासह ग्रामीण भागांमध्ये 

 मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात पडल्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झालेला आहे. गेलेल्या तीन दिवसापासून तापमानामध्ये चढ - उतार होत असलेले चित्र दिसत आहे.

 या बदलत्या वातावरणाचा फटका गहू ,ज्वारी,हरभरा, लसूण,कांदा, द्राक्ष, डाळिंब, आंबा व भाजीपाल्यासह अनेक पिकांना मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. 

शेतकरी हातात तोंडाशी आलेली पिके जमीनीदोस्त झाली आहेत.या सर्व नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने तयार करून लवकरात लवकर शासनाने सर्वतोपरी मदत करावी.

सामाजिक कार्यकर्ते:- हनुमंत गोपाळ सरगर 

महाराष्ट्र राज्य शासनाने पडलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी ही विनंती.

Post a Comment

0 Comments