धक्कादायक प्रकार.. पतीवरील संकट दूर करण्याचे आमीष दाखवून भोंदू महाराजांकडून पत्नीवर अत्याचार!
मंगळवेढा : पतीवरील आर्थिक संकट दूर करण्याचे आमीष दाखवत वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक विधी करण्याचे करून पुणे येथे नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून
तिचा विनयभंग केल्याप्रकरणी भोंदू बाबासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी तिन्ही आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले आहे
या प्रकरणाची फिर्याद वीस वर्षीय पीडित महिलेने दिले असून पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार दि. 26 मार्च रोजी दुपारी 12/30 वा चे सुमारास ते दिनाक 14 एप्रिल रोजी 5/30 वा चे दरम्यान फिर्यादी
महिलेच्या पतीचे मित्र समाधान अर्जुन गड्दे रा तरटगाव ता पंढरपूर हे आधुन मधुन फिर्यादीच्या घरी येवुन तुमचे घरावरील आर्थिक संकट दुर करतो असे सांगुन आमचे आर्थिक फसवनुक करण्याचे उद्देशाने
त्यांचे ओळखीचे आप्पा कोळेकर महाराज रा ठानगाव पानसेत जिल्हा पुणे यांच्याशी यांचेशी संगनमत करून फिर्यादीच्या घरात होमहवन करून नारळ, बावन पुढ्या असलेले विधीचे साहित्य कापुर, उद लिंबु व काळ्या
कपड्याच्या दोन बाहुल्या असे सर्व साहित्य आणुन ते होमहवनात टाकुन त्याचे भस्म झालेनंतर ते भस्म घरात जपुन ठेवायला सांगुन आम्हाला तुमचे घराला पितृ दोष लागलेला आहे ते घालविण्यासाठी तुम्हाला ठानगाव, पानशेत जि. पुणे येथे यावे लागेल
असे सांगुन समाधान गडदे याचे सोबत बोलेरो गाडी मध्ये मला पती दिर भावजई, सासु, व मुले असे सर्वाना व सिध्देवाडी गावचे पुढे गेल्यानंतर आणखी दोन महिला व एक पुरूष असे गाडीत बसवुन ठानगाव पानसेत जिल्हा पुणे येथे घेवुन
जावुन डोंगरावरील मंदीरात महाराजांनी एकटीला नारळ ठेवण्यास सांगुन तेथील आंधाराचा फायदा घेवुन मला जवळ ओढुन घेतले तु धाडस वाडव, देव तुझ्या जवळ येत आहे, तु माझ्या पुर्व जन्माची पत्नी आहे
असे म्हणुन त्यांचे जवळील भस्म पावडर माझ्या अंगावर टाकून आरडा-ओरडा केली तर जिव मारीन अशी धमकी देवुन शारीरिक संबंध प्रस्थापित करून परत दिनाक 14 एप्रिल रोजी 5 वा चे सुमारास मंगळवेढ्यातील घरात उत्तरपुजा करावी लागेल
म्हणुन नारळ, लिंबू, काळ्या भाहुल्या , व इतर साहीत्यांनी होमहवन करून घरात धुप पेटवुन व त्यांनंतर महाराज पोलेकर यांनी पिडीत महिलेस बाजूला किचन खोलीत नेवून अंगावर भस्म पावडर टाकुन माझे मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले.
सदर प्रकार कोणास काही सांगीतले तर मंत्र मारून तुला व तुझ्या कुटूंबास उध्दवस्थ करून टाकीन असे धमकी देवून समाधान अर्जुन गडदे यांनी महाराजांची
दक्षिणा म्हणुन 20 हजार रू घेवुन गेले.याप्रकरणी आप्पा कोळेकर महाराज त्याचा सेवक, दत्ता (पुर्ण नाव माहीत नाही) रा. ठानगाव पानसेत जिल्हा पुणे,समाधान अर्जुन गडदे रा तरटगाव ता. पंढरपुर यांचे विरूध्द फिर्याद दाखल केली.
आरोपी ताब्यात घेण्याची कामगिरी पोलीस निरीक्षक रणजित माने, सपोफौ अविनाश पाटील, पोहेकॉ दयानंद हेंबाडे पोहेकॉ हजरत पठाण, पोना सुनिल मोरे, पोकॉ अजित मिसाळ, पोकॉ राजु आवटे यांनी केली
0 Comments