श्री सोमा (आबा) मोटे बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ घेरडी संस्थेच्या यशराज प्राथमिक शाळेस राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार प्रदान
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
प्रतिनिधी (शशिकांत कोळी): दि.07 मे 2025 रोजी सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिर येथे एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे राज्यस्तरीय संस्थाचालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये आदर्श संस्था, संस्थाचालक पुरस्कार वितरण सोहळा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
त्यामध्ये श्री सोमा (आबा) मोटे बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ घेरडी संस्थेच्या यशराज प्राथमिक शाळेला राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्काराने महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम व उपमुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख (महाराष्ट्राचे आरोग्य दूत) मंगेश चिवटे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख (आरोग्य दूत) मंगेश चिवटे, जिल्ह्याचे शिवसेनाप्रमुख मनीष काळजे, प्रा. डॉ. बापूसाहेब अडसूळ, संस्थापक अध्यक्षआबासाहेब मोटे, सचिव राजू मोटे,
संस्थेचे सर्व पदाधिकारी संस्थेचे तज्ञ मार्गदर्शक मा. प्रा.मारुती खरात , मुख्याध्यापक महेश पुकळे, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व पालक वर्ग आणि सांगोला तालुका परिसरातून संस्थेचे व शाळेचे कौतुक होत आहे.
0 Comments