खळबळजनक..सांगोला तालुक्यातील मांजरी येथील खाकी वर्दीतील आर. टी.ओ. ने काय केले ? वाचा-
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : शनिवार (ता.३) रात्री नऊ वाजता ची वेळ, धाराशिव जिल्ह्याचे वायुवेग पथकात तुळजापूर सोलापूर महामार्गावर अधिकारी तपासणी करत असताना अचानक एका ठिकाणी लोकांचा जमाव दिसून आला.हा जमाव का झाला
असेल म्हणून स्वतः मोटार वाहन निरीक्षक सचिन बंग तपासणीचे वाहन बाजूला घेऊन त्यांच्या समवेत असलेले सांगोला तालुक्यातील मांजरी येथील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अजित पवार यांनी खाली उतरून पाहिले
असता तेथे मोठा अपघात झाल्याचे निदर्शनास आले. त्यांना मदत करणे हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचे वाटले आणि….याबाबत असे की, एका दुचाकी वर दोन तरुण भरधाव वेगाने धाराशिवहून सोलापूरच्या दिशेने निघाले होते
आणि अचानक महामार्गावर तेथील जवळच्या लोकवस्तीतील एक इसम महामार्ग पार करण्यासाठी कोणत्याही वाहतुकीचा अंदाज न घेता समोर आला.आणि ह्यातच अपघात घडला. सिंधफळ या गावातील
एका स्थानिक जखमीला लोकांनी रिक्षामध्ये रुग्णालयात पाठवले मात्र अन्य दुसऱ्या अपघात ग्रस्त यांच्यासाठी रुग्णवाहिका येण्यासाठी २० ते ३० मिनिटे लागतील असे कळताच दुसऱ्या रुग्णाला ज्याची ही प्रकृती चिंताजनक होती
त्वरित पथकातील मोटरवाहन निरीक्षक सचिन बंग यांनी चालक गणेश बासर यांच्या मदतीने RTO च्या कार्यालयीन चारचाकी वाहनातून तुळजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
तसेच महामार्गावर जमलेली गर्दी व त्यामुळे अन्य काही दुर्घटना होऊ नये यासाठी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अजित पवार व चालक बळीराम शिंदे यांच्या मदतीने वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. ज्याठिकाणी आर टी ओ ची गाडी दिसताच
क्षणी वाहनचालक धूम ठोकतात, परंतु याठिकाणी स्वतः अधिकारी रस्त्यावर घडलेला अपघात होऊन अपघात ग्रस्ताना मदतीला धावतात,यावठिकाणी त्या अपघात ग्रस्ताच्या नका तोंडातून रक्त येत होते,
ते आर टी ओ च्या गाडीत सांडत होते, तरीपण त्यालवधीर देत देत रुग्णालय गाठून त्याठिकाणी दाखल केले. यावरून खाकी वर्दीतील आर टी ओ माणुसकी पाहता जमा झालेले नागरिक अचंबित झाले.
यावेळी जनसामान्यांमधून आर टी ओ आज जीवनदूत म्हणूनच आले अशा प्रतिक्रिया कुजबुजत होत्या. खरंच ह्या अधिकाऱ्यांनी उचललेले एक छोटेशे पाऊल एखाद्याला जीवनदान देऊ शकतो याचे हे जिवंत उदाहरण काल निदर्शनास आले आहे.
वाहन चालकांनी आपले वाहने काळजीपूर्वक चालवावीत,कोणत्याच वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करू नये, ज्याठिकाणी माणुसकी ची गरज असते
अशावेळी तर आम्ही धाऊन जात असतोच. नागरिकांनी शिस्तीचे पालन केले तर निश्चितच अपघात टळतील. – अजित पवार ( सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक).
0 Comments