google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला विद्यामंदिरचा शुभम शेटे इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षेमध्ये अर्थशास्त्र विषयात महाराष्ट्र राज्यात प्रथम

Breaking News

सांगोला विद्यामंदिरचा शुभम शेटे इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षेमध्ये अर्थशास्त्र विषयात महाराष्ट्र राज्यात प्रथम

सांगोला विद्यामंदिरचा शुभम शेटे  इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षेमध्ये  अर्थशास्त्र विषयात महाराष्ट्र राज्यात प्रथम


 (शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

 सांगोला (प्रतिनिधी) इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षा 2025 चा ऑनलाईन निकालामध्ये सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी कुमार शेटे शुभम सोमेश्वर याने इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षा 2025  अर्थशास्त्र

 विषयात 100 पैकी 99 गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात आणि पुणे बोर्डामध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला. त्याला 12 वी बोर्ड परीक्षेत एकूण मार्क आहेत  600 पैकी 507  गुण आहेत.तर

84.50% गुण मिळाले. त्याला मोलाचे मार्गदर्शन  लाभले ते अर्थशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख,विषय शिक्षक,प्रा.एन. डी.बंडगर तसेच विषय शिक्षक प्रा.एस.एम टकले, पालक शिक्षक म्हणून प्रा.एस.डी. आलदर, वाणिज्य विभागाचे प्रा.राजेंद्र कुंभार,

 प्रा.प्रसाद खडतरे, प्राध्यापिका सुवर्णा लवटे, यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.सोमेश्वर शेटे यांची घरची प्रतिकूल असतानाही  दररोज कोळा ते सांगोला  असा प्रवास एसटीने करत असे. 

अशा कठीण वाटणाऱ्या  अर्थशास्त्र विषयात भरगोस असे यश संपादित केल्याने कोळा पंचक्रोशीसह  सर्वत्र कौतुक केले जात आहे. शुभमचा पुढे सीए (CA) होण्याचा मानस आहे. 

सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे  व मार्गदर्शक शिक्षकाचे अभिनंदन सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष-प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर, सचिव-  मं.श.घोंगडे,सहसचिव-प्रशुद्धचंद्र झपके साहेब,कार्यकारणी सदस्य विश्वेशजी झपके साहेब, 

 व इतर संस्था कार्यकारणी सदस्य, कर्तव्यदक्ष प्राचार्य अमोल गायकवाड,उपप्राचार्य  प्रकाश म्हमाणे,उपमुख्याध्यापिका सौ.शहिदा सय्यद,पर्यवेक्षक सुरेश मस्तूद,मच्छिंद्र इंगोले,प्रदीप धुकटे व सर्व स्टाफ   इत्यादींने

 सदर विद्यार्थ्याला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments