google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..प्राचार्य महेश होनराव खून प्रकरणाची माहिती देणाऱ्याला सीबीआयच्या विशेष पथका कडून १० लाखांचे इनाम १५ वर्षांनंतर मारेकरी कायद्याच्या कचाट्यात सापडणार?

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..प्राचार्य महेश होनराव खून प्रकरणाची माहिती देणाऱ्याला सीबीआयच्या विशेष पथका कडून १० लाखांचे इनाम १५ वर्षांनंतर मारेकरी कायद्याच्या कचाट्यात सापडणार?

ब्रेकिंग न्यूज..प्राचार्य महेश होनराव खून प्रकरणाची माहिती देणाऱ्याला सीबीआयच्या विशेष पथका


कडून १० लाखांचे इनाम १५ वर्षांनंतर मारेकरी कायद्याच्या कचाट्यात सापडणार?

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : १५ वर्षांपूर्वी सांगोला येथील शोभनतारा चं झपके अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य महेश होनराव यांचा अत्यंत निर्दयीपणे खून करण्यात आला होता. या घटनेला आता १५ वर्षे उलटली 

तरी, याबाबत ठोस तपास होत नसल्याने या खून प्रकरणाची माहिती देणाऱ्यास रोख १० लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा सीबीआयच्या विशेष पथकाने प्रसिद्धी पत्रक काढून केली आहे.

पोलीस निरीक्षक नितीन जगताप हे महेश होनराव हत्या प्रकरणाचा समाधानकारक तपास करीत नसल्याची तक्रार महेश होनराव यांच्या पत्नी रूपाली होनराव यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली होती. 

त्यानुसार मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. संजय स्वामी यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. स्वामी यांनी सदर प्रकरणाचा सहा महिने तपास केला. परंतु खून कोणी केला याचा तपास तेही लावू शकले नाहीत.

 यावर मृत महेश होनराव याच्या पत्नी रूपाली यांनी तपास योग्य दिशेने होत नाही म्हणून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशा मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.

तब्बल १५ वर्षानंतर तरी प्राचार्य महेश होनराव यांच्या मारेकऱ्यांचा तपास आता तरी लागणार का ? की सत्ता संपत्ती आणि राजकीय पाठबळ याच्या जीवावर आणखी किती 

वर्षे खुनाचा मारेकरी व मास्टरमाइंड कायद्याच्या कचाटया पासून पळ काढणार अशी  चर्चा सांगोला शहरात सुरू आहे. एवढे वर्षे झाली 

तरी या खुनाचा तपास होवून खऱ्या आरोपीस अटक होणार का? याकडे सांगोला तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्हयाचे लक्ष लागूल राहिले आहे.सीबीआयनेही महेश होनराव हत्या प्रकरणाचा तपास केला.

 परंतु सीबीआयलाही या प्रकरणाचा तपास करण्यात यश झाले नाही. त्यामुळे सीबीआयने आता या खून प्रकरणाची अचूक माहिती देणाऱ्या नागरिकांना १० लाख रुपयांचे रोख इनाम जाहीर केले आहे.

माहिती खालील फोन नंबर अथवा पत्यावर देण्यात यावी.कार्यालय -पोलीस उप-महानिरिक्षक,केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI),विशेष कार्य शाखा (STB)तपासी अधिकारी,पोलीस निरीक्षक, CBI, विशेष कार्य शाखा मो.८३६९४८१४४५,७ वा माळा, सी.बी. आय बिल्डींग,

 प्लॉट नं. ३५ए, “G” ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स, बांद्रा (पुर्व), मुंबई- ४०००९८.संपर्क:- फोन नंबर:- ०२२-२६५२९५६६, २६५२९५३४.Email ID: hobstmum@cbi.gov.inमाहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments