श्री. विठ्ठल मल्टिस्टेटच्यावतीने उन्हाळी सुट्टीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी) - सांगोला येथील श्री. विठ्ठल मल्टिस्टेट को.ऑप क्रेडिट सोसायटीच्यावतीने उन्हाळी सुट्टीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी एक खास अफलातून
प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन दिपक बंदरे यांनी दिली.
ही स्पर्धा दि. १० मे ते ३० मे या कालावधीत होणार आहे. ही स्पर्धा इ. ५, इ. ६, इ. ७, इ. ८ वी. या वर्गातील विद्यार्थ्यांसाठीच असेल. सदर स्पर्धेचे प्रश्न हे स्थानिक वृत्तपत्रातून दररोज प्रसिद्ध केले जातील.
तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्या स्टेटसला प्रश्न दिसतील. त्यासाठी ९६२३०३४००१, ९५५२२१४००१, ९१३०८०४००१, ९९२१९३४००१ हे क्रमांक सेव करून ठेवावेत. या नंबरवरती दररोज २१ दिवस १ प्रश्न स्टेटसला ठेवण्यात येईल.
त्याचा स्क्रीनशॉट काढून उत्तर लिहून प्रिंट काढून आपल्या जवळील शाखेमध्ये जमा करावी. या प्रश्नांची उत्तरे दि. १४ मे, २१ मे आणि ३१ मे या दिवशी शाखेमध्ये सकाळी ११ ते सायं. ५ या वेळेत जमा करावी.
लकी ड्रॉ प्रमाणे २१ विद्यार्थ्यांचे नंबर काढण्यात येतील. २१ प्रश्नांची उत्तरे बरोबर येणारे विद्यार्थीच बक्षिसास लकी ड्रॉ द्वारे पात्र ठरतील. विजेत्या स्पर्धकाना शालेय कीट देण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ९६२३०३४००१ या नंबरवरती संपर्क करावा. सदरच्या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन चेअरमन दिपक बंदरे यांनी केले आहे.
0 Comments