धक्कादायक प्रकार.. पंढरपुरात कसल्यातरी बैठकीला म्हणून जाणाऱ्या पाच महिला लॉजवर रंगेहाथ पकडल्या..
पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यात मोठ्या प्रमाणात सेक्स रॅकेट चालत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पंढरपुरात कसल्यातरी बैठकीला म्हणून जाणाऱ्या पाच महिला माळशिरस तालुक्यातील एका लॉजवर रंगेहाथ पकडल्या गेल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
त्यावरून पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यात मोठे सेक्स रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पंढरपूर शहराजवळील ग्रामीण भागातील अनेक महिला ठराविक दिवशी कसल्यातरी बैठकीला म्हणून पंढरपुरात विशिष्ट ठिकाणी जातअसतात. त्या माध्यमातूनच काही महिला शरीर विक्रीच्या व्यवसायात ओढल्या जात
असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून दबक्या आवाजात पंढरपुरात चालू होती. ती चर्चा नुकतीच खरी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
माळशिरस तालुक्यातील वेळापूर परिसरातील एका लॉजवर पाच महिला पोलिसांनी रंगेहाथ पकडल्याची चर्चा पंढरपूर जवळच्या ग्रामीण भागातून सुरू झाली आहे. या पाचही महिला गेल्या
काही वर्षापासून बैठकीला म्हणून पंढरपुरात येत असल्याचेही ग्रामस्थांतून बोलले जात आहे. माळशिरस तालुक्यात असणाऱ्या एकाएजंटाच्या माध्यमातून काही महिला अशा उद्योगात सामील असल्याची चर्चा सुरू आहे.
सुमारे १०-१२ दिवसांपूर्वी वेळापूर परिसरातील एका लॉजवर पाच महिलांना पोलिसांनी पकडल्याचे सांगितले जात आहे.
या महिला पंढरपूरजवळच्या ग्रामीण भागातील असून हा प्रकार नियमितपणे सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यावरून बैठकीच्या नावाखाली नेमके काय चालू आहे. याविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान, या संदर्भात वेळापूर पोलिसांशी संपर्क साधला असता अशाप्रकारची कारवाई झाल्याच्याकोणत्याही गोष्टीचा इन्कार करण्यात आला आहे. वेळापूर परिसरात काही लॉज अशाप्रकारांना आश्रय देत असल्याची चर्चा नेहमीच ऐकू येते..
त्यामुळे नेमक्या कुठल्या लॉजवरून या महिला पकडल्या गेल्या याचीही सर्वसामान्यांकडून कसून चौकशी केली जात आहे. वेळापूर परिसरातील लॉजवरच पकडल्याचे मात्र खात्रीने सांगितले जात आहे.
हा प्रकार उघडकीस आल्यापासून त्या बैठकीकडेही संशयाने पाहिले जात असून पंढरपूर- माळशिरस तालुक्यात सेक्स रॅकेट चालवले जात असल्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.
0 Comments