google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज.. उष्माघाताच्या सर्व रुग्णांचे उपचार मोफत ; मृतांच्या वारसदारास 5 लाखांची मदत

Breaking News

ब्रेकिंग न्यूज.. उष्माघाताच्या सर्व रुग्णांचे उपचार मोफत ; मृतांच्या वारसदारास 5 लाखांची मदत

 ब्रेकिंग न्यूज.. उष्माघाताच्या सर्व रुग्णांचे उपचार मोफत ; मृतांच्या वारसदारास 5 लाखांची मदत

आज रविवारी नवी मुंबईतील खारघर येथील भव्य मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला 

परंतु त्या आनंदाला गालबोट लागले असून सात ते आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहे अशी माहिती मिळाली आहे.

महाराष्ट्र भूषण सोहळ्यात आलेल्या ज्या सदस्यांना उष्माघातांचा त्रास झाला आणि ज्यांच्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते सर्व उपचार मोफत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिलेल्या आहेत. ज्या श्री सदस्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला

 त्यांच्या वारसदारास तातडीने पाच लाखांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रविवारी रात्री केली. श्री सदस्यांची रुग्णालयात भेट घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया…

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या श्री सदस्यांना लवकरात लवकर बरे करण्याची जबाबदारी प्रशासनाची असून यासाठी उपायुक्त दर्जाचा अधिकारी तात्काळ नेमणूक करण्यात आलेला आहे असेही त्यांनी सांगितले.

रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या 24 असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

विरोधकांनी केलेल्या टीकेवर बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की ही कोणतीही राजकीय बाब नसून श्री सदस्यांना तात्काळ बरे करण्याचे महत्त्वाचे काम आहे.आजची ही सर्वांसाठी दुर्दैवी घटना असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आज सकाळी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहोळ्यात सहभागी काही श्रीसदस्यांचे उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे.

मी या साधकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारमार्फत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केली आहे.

जे लोक उपचार घेत आहेत, त्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

स्वतः मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाला भेट देत माहिती घेतली आणि डॉक्टरांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. 

प्रशासन संपूर्ण समन्वय ठेवून असून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत. अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे

Post a Comment

0 Comments