सांगोला वाढेगांव माणगंगा नदीत शनिवारी श्रमदान स्वच्छता अभियान
वाढेगाव (प्रतिनिधी): माणगंगा भ्रमणसेवा संस्था व संत निरंकारी मंडळ शाखा, सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने वाढेगाव को.प. बंधारा ते त्रिवेणी संगम
नदीपात्र व परिसर श्रमदानातून स्वच्छता करण्याचे आयोजन शनिवार दि. ८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.
या स्वच्छता अभियानात माणनदीकाठचे आठ ते दहा गावातील ग्रामस्थ, महिला तसेच दोन्ही संस्थेचे सभासद असे २०० हून अधिक सेवक या श्रमदान अभियानात सहभागी होणार आहेत.
यामध्ये नदीपात्रात पडलेले दगडगोटे, पूर्वीच्या स्वच्छतेनंतर वाढलेल्या चिलार बाभळी, इतर उपद्रवी वनस्पती काढणे तसेच नदीकाठावर वृक्षारोपण करण्याच्या दृष्टीने दोन्ही बाजूचे बांध अधिक मजबूत करणे इ. कामे श्रमदानातून करण्यात येणार आहेत.
अशी माहिती माणगंगा भ्रमणसेवा संस्थेचे अध्यक्ष वैजीनाथ घोंगडे व संत निरंकारी मंडळ शाखेचे प्रमुख रावसाहेब सरगर (सर) यांनी दिली.
या अभियानात कोणाला सहभाग घ्यायचा असेल त्यानी शुक्रवारी मो. ९४२००९३५९९, ७०२०६२०४५९ या नंबरवर नोंदणी करुन शनिवारी सकाळी कामाच्या वेळेत खुरपे, कुन्हाड, बेडगे इ. पैकी एक अवजार घेऊन यावे.


0 Comments