अशोक कामटे संघटनेचे रेल्वे महाव्यवस्थापक यांना मागण्यांचे निवेदन
मिरज -मुंबई- मिरज रेल्वे सुरू करावी :-अशोक कामटे संघटना
सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)
सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सध्या जी पंढरपूर- दादर -पंढरपूर ही रेल्वे सुरू असून त्याचा विस्तार मिरजपर्यंत करण्यात यावा म्हणजे कवठेमंकाळ, ढालगाव ,जत रोड, सांगोला येथील प्रवाशांची मुंबई येथे थेट जाण्याची मोठी सोय होणार आहे.
त्याचबरोबर पंढरपूर ही मोठी तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणहून थेट तिरुपती, गोवा ,केरळ या राज्यांकडे रेल्वे सेवा उपलब्ध करून द्यावी, 22155 & 22156कलबुर्गी -कोल्हापूर -कलबुर्गी या रेल्वेस सांगोला थांबा मिळावा,
सांगोला स्टेशनवर मेल एक्सप्रेस, सुपरफास्ट या रेल्वे आल्यावर सामान्य प्रवाशांना कोणत्या डब्यात चढावे हे समजत नसल्याने मोठी गैरसोय होत आहे त्याकरिता स्टेशनवर कोच इंडिकेटरची सुविधा करावी
,आरक्षण खिडकीची वेळ वाढवावी व स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करावा उन्हाळी स्पेशल रेल्वे गाड्या या मार्गावर सुरू कराव्यात ,या विविध मागण्यांचे निवेदन रेल्वे प्रशासनास शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने देण्यात आले.
या निवेदनाची प्रत विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर ,खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाही देण्यात आल्याची माहिती शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने देण्यात आली .
रेल्वे विभागाकडून वरील समस्या संदर्भात सकारात्मक विचार करून कार्यवाही करणार असल्याचे शहीद अशोक कामटे संघटनेच्या शिष्टमंडळास सांगितले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
चौकट:-
शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्यावतीने रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांची निवेदन आमच्या विभागास प्राप्त झाले असून त्यासंदर्भात विविध मागण्यांच्या मंजुरी करता हे पत्र वरिष्ठ कार्यालयास पाठवले असून मंजुरी मिळतात वरील रेल्वे गाड्या सुरू होणार आहेत याबाबतची निवेदने आम्हास प्राप्त झाली आहेत.
एस व्ही ताजुद्दीन, विभागीय रेल्वे व्यवस्थापकांचे सचिव ,सोलापूर.


0 Comments