Breaking News

धक्कादायक बातमी! ट्रॅक्टर अंगावर पडल्याने मंगळवेढ्यातील एका शेतकऱ्याचा मृत्यू

धक्कादायक बातमी! ट्रॅक्टर अंगावर पडल्याने

मंगळवेढ्यातील एका शेतकऱ्याचा मृत्यू 

ट्रॅक्टर खड्ड्यात गेल्याने अंगावर पडून एका शेतकऱ्याने आपले प्राण गमावले आहेत. मंगळवेढा तालुक्यात भाळवणी हद्दीत हा अपघात झाला आहे.

 ट्रॅक्टर अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात झाली आहे.

सुभाष रामहरी गायकवाड (वय-55 रा. भाळवणी ता.मंगळवेढा) असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून याची फिर्याद बालाजी तुकाराम चव्हाण (रा.ब्रम्हपुरी ता.मंगळवेढा) यांनी दिली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, काल दि.14 एप्रिल रोजी दुपारी 1 च्या सुमारास फिर्यादीचे मेव्हणे मयत सुभाष रामहरी गायकवाड हे त्यांचे शेतात टॅक्टर चालवित घराकडे येत असताना

 शेतातील खड्यात टॅक्टरचा तोल जावुन अंगावर पडून टॅक्टरचे बोणेट पडल्याने त्यात ते गंभीर जखमी होवुन स्वतः चे मयतास व टॅक्टरचे किरकोळ नुकसानिस कारणीभुत झाला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

मयत सुभाष रामहरी गायकवाड हे आपल्या घरातील टॅक्टरने शेतातून येत असताना सदरचा टॅक्टर हा शेतातील खड्यात पलटी होवुन टॅक्टरच्या बोणेट खाली सापडुन गंभीर जखमी झाले होते.

आजु-बाजुच्या लोकांच्या मदतीने टॅक्टर उचलुन त्यांना बाहेर काढून उपचारा करीता रुग्णालयात आणत असताना वाटेतच त्यांना मृत्यूने गाठले.

Post a Comment

0 Comments