Breaking News

कोळे ता. सांगोला येथील बेनझीर (मुन्नी) महिबुब आतार यांची मुंबई रेल्वे पोलिस मध्ये निवड...

 कोळे ता. सांगोला येथील बेनझीर (मुन्नी) महिबुब आतार यांची मुंबई रेल्वे पोलिस मध्ये निवड...

कोळे / वाहिद आतार.... (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)

कोळे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. महिबुब उमरोद्दिन आतार यांची कन्या  बेनझीर (मुन्नी) महिबुब आतार हीचे मुंबई इथे झालेल्या रेल्वे पोलिस भरती मध्ये निवड झाली आहे.

 घरची परिस्थिती अत्यंत बिकट व हलाखीची असताना जिद्द,चिकाटी,मेहनत बुध्दीमत्ता, अथक अभ्यासाच्या जोरावर तिने अखरे यश संपादन केले. त्यामुळे सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. बेनझीर आतार यांचा सत्कार 

संपत आलदर रेल्वे पोलिस मुंबई, कोळे गावचे उपसरपंच डॉ. सादिक पटेल ,मंडप व्यावसायिक बालेखान तांबोळी, आलम मुलाणी, मीना पटेल,दिलीप कोळेकर ग्रा.सदस्य कोळे व 

विद्यामंदिर प्रशाला & ज्युनियर कॉलेज कोळे व विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

या वेळी विद्यामंदिर प्रशाला कोळे चे परवेक्षक श्री.रफिक मनेरी सर, मारूती सरगर सर, फिरोज आतार सर, क्रीडा शिक्षक नराळे सर, जे. पी. माने सर, शिंदे सर, विनोद देशमुख सर, व कोळे विद्यामंदिर चे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments