Breaking News

सांगोला चिकमहूद येथे डॉ.आंबेडकर पुतळ्याची मिरवणूक

सांगोला चिकमहूद येथे डॉ.आंबेडकर पुतळ्याची मिरवणूक

महुद ता. सांगोला तालुक्यातील चिकमहुद येथे डॉ. आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येत आहे. या पुतळ्याची भव्य मिरवणूक शुक्रवारी चिकमहूद येथे काढण्यात आली.

चिकमहुद (ता. सांगोला) येथे डॉ. आंबेडकर स्मृती उद्यानाच्या ठिकाणी पुर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. हा नवीन पुतळा दि. १४. रोजी चिकमहुद येथे आणण्यात आला. 

आमदार अॅड. शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महुद येथील भीमसैनिकांनी फुलांचा वर्षाव करीत

 आनंद उत्सव साजरा केला. आमदार शहाजी पाटील यांच्या पत्नी रेखाताई पाटील, शोभाताई कदम, राणीताई कदम यांच्या हस्ते पुतळ्याचे व प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी माजी उपसरपंच सुरेश कदम, पंचायत समितीचे माजी सभापती राहुल काटे, पंकज काटे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील सावंत, पत्रकार वैभव काटे, गौतम चंदनशिवे, पंढरी भोसले, 

अविनाश कदम, शोभा कदम,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना आमदार अॅड. शहाजीबापू पाटील,राणीताई कदम, राकेश कदम, ग्रामविकास अधिकारी

 आत्माराम कोळी, संतोष बनसोडे, दादा क्षीरसागर, प्रदीप काटे, सुरज लकेश्वर, अमोल चंदनशिवे, देवदत्त काटे, विज्ञान जगताप, माऊली धांडोरे, सुरज धांडोरे, संतोष काटे, धनाजी घांडोरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments