google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला कोळे येथील इमडे वस्तीतील रोख पैसे, सोने - ठेवलेली पेटी मिळून एक लाख पन्नास हजार एकशे पन्नास रुपयांची दागिन्यांची पेटी पळवली

Breaking News

सांगोला कोळे येथील इमडे वस्तीतील रोख पैसे, सोने - ठेवलेली पेटी मिळून एक लाख पन्नास हजार एकशे पन्नास रुपयांची दागिन्यांची पेटी पळवली

 सांगोला कोळे येथील इमडे वस्तीतील रोख पैसे, सोने - ठेवलेली पेटी मिळून

एक लाख पन्नास हजार एकशे पन्नास रुपयांची  दागिन्यांची पेटी पळवली

सांगोला : कोळे येथील इमडे वस्तीत रोख पैसे, सोने - ठेवलेली पेटी मिळून एक लाख पन्नास हजार एकशे पन्नास रुपयांची चोरी झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

 याबाबत ज्ञानेश्वर इमडे यांनी सांगोला पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. १४ एप्रिल रोजी मध्ये रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास वीस ते तीस वयाचा काळा शर्ट व बरमूडा घातलेला चोरट्याने पेटी घेऊन पळाला आहे

 त्याला आसपास शोधले परंतु सापडला नाही ज्ञानेश्वराने आपले आईला विचारले की पेटीत काय होते तर आईने सांगितले की दोन हजार रुपये पाचशे रुपये तसेच शंभर रुपयाचे असे एकूण ७५ हजार रुपये रोख होते

 ७५ हजार रुपयाचे सोन्याचे दागिने व दीडशे रुपये च्या किमतीची पत्र्याची पेटी असे एक लाख पन्नास हजार एकशे पन्नास रुपये चोरून नेले आहे. भाऊ सुरेश यांच्या घरातील दोन पर्स घेऊन रानात टाकले आहे.

 तसेच जवळच बोधगिरे वस्तीवरील सुनील तायाप्पा आलदर यांच्या मालकीची यामा मोटरसायकल एम एच दोन एफ ३१ २१ ही दुचाकी चोरीस गेल्याचे समजले

 अज्ञात चोरट्या विरुद्ध सांगोला पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments