धक्कादायक घटना.. हातपाय बांधले, पोत्यात भरून विहिरीत टाकलं; बाजार समिती निवडणूक उमेदवाराचा संशयास्पद मृत्यू
राज्यामध्ये सद्या बजारसमिती निवडणुकांचा धुरळा उडत आहे. या निवडणुकांमुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
यामध्ये आता जु्न्नर बाजार समितीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना पुढे आलीय. त्यामुळे जुन्नर तालुक्यात एकच खळबळ उडाली.
किशोर कोंडिभाऊ तांबे (वय ४०) असे मृत्यू झालेल्या बाजार समिती निवडणुक उमेदवाराचे नाव आहे. तांबे हे गुरुवारी रात्री शेतात गेले होते. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत.
त्यामुळे कुटुंबीयांनी शोध घेतला असता गुरुवारी दुपारच्या सुमारास घराजवळील विहिरीत तांबे यांचा मृतदेह सापडला.
तांबे यांचे हात पाय बांधून त्यांना पोत्यात भरण्यात आले होते. तसेच पोत्याला दगड देखील बांधण्यात आला होता.
तांबे यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याने घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच पोलिसांना मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.


0 Comments