खळबळजनक आज शनिवारी सकाळी सोलापुरात हॉटेल मालकाची आत्महत्या
सोलापूर शहरातील जुना पुना नाका म्हणजेच छत्रपती संभाजीराजे चौक येथील एका हॉटेल मालकाने आज शनिवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
जुना पूना नाका, हांडे प्लॉट येथील अण्णा कॅन्टीन ( त्रिमूर्ती हॉटेल)चे मालक सोमनाथ दगडोबा क्षीररसागर वय वर्षे 40 राहणार हांडे प्लॉट, सोलापूर यांनी आज शनिवार सकाळी साधारण साडेपाच ते सहाच्या दरम्यान आत्महत्या केली असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
आज शनिवारी सकाळी हॉटेल उघडण्यासाठी अण्णा कॅन्टींनचे मालक सोमनाथ हे गेले होते. हॉटेलमधील लोखंडी अँगलला वायरच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने त्यांच्या लहान मुलाने हे दृश्य पाहून त्याच्या काकाला बोलावले आणि पुढील प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती नातेवाईकांना समजताच हॉटेल परिसरात त्यांची आणि परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून सिव्हिल हॉस्पिटल येथे उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह हलवण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथील लादेन यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.
अज्ञात कारणामुळे आत्महत्या..
सोमनाथ क्षीरसागर हे स्वभावाने शांत होते. त्यांचे कोणाशीच भांडण तंटा नसल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. अचानक कोणत्या कारणामुळे आत्महत्या झाली असावी याची चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबातील महिलांनी मोठा आक्रोश केला आहे.
त्यांच्या पश्चात एक भाऊ ,पत्नी ,1 मुलगा 1 मुलगी असा परिवार आहे. क्षीरसागर हे एकत्र कुटुंब पद्धतीत राहत होते.अशी माहिती त्यांचे चुलत बंधू अजिनाथ क्षीरसागर यांनी दिली.


0 Comments