google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला विद्यामंदिर येथे दि.८ ते १०एप्रिल पर्यंत राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन

Breaking News

सांगोला विद्यामंदिर येथे दि.८ ते १०एप्रिल पर्यंत राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन



सांगोला विद्यामंदिर येथे दि.८ ते १०एप्रिल

पर्यंत राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन

सांगोला : सांगोल्यात राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन दिनांक 8 ते 10 एप्रिल रोजी होणार आहे.

 पहा व्हिडिओ...


या साहित्य संमेलनाचे संमेलन अध्यक्ष म्हणून इंद्रजीत भालेराव तर स्वागताध्यक्ष आमदार शहाजी पाटील असणार आहेत.


 

या साहित्य संमेलनाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार तर समारोप व गौरव समारंभासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

शनिवार दिनांक 8 एप्रिल रोजी या संमेलनाच्या ग्रंथदिंडीचे उद्घाटन आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते होणार आहे. मुख्य उद्घाटन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन समारंभासाठी महसूलमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,


खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर उपस्थित राहणार आहेत. त्याच दिवशी चंदाताई तिवारी यांचे भारुड, लेखक आपल्या भेटीला, कवी संमेलन, लोककला रजनी असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

रविवारी 9 एप्रिल रोजी परिसंवादामध्ये संत साहित्य व समाज परिवर्तन, आप्पासाहेब खोत व ज्योतीराम फडतरे यांचे कथाकथन, 

ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा इंगोले यांची मुलाखत, माणदेश स्वरूप आणि साहित्य याबाबत परिसंवाद, कवी संमेलन - भाग दोन व महाराष्ट्राची लोकधारा असे कार्यक्रम होणार आहेत.

 सोमवार दिनांक 10 एप्रिल रोजी परिसंवादामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आणि साहित्य, चित्रपट अभिनेते व कवी किशोर कदम यांची मुलाखत, आई एक महाकाव्य असे कार्यक्रम होणार आहेत.

या ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये डॉ. दत्ता भोसले, योगीराज वाघमारे, भास्कर चंदनशिव, डॉ. कृष्णा इंगोले यांचा गौरव केला जाणार आहे.

 गौरव समारंभ व समारोपच्या कार्यक्रमासाठी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, आमदार शहाजी पाटील आमदार समाधान आवताडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील उपस्थित राहणार आहेत. 

या पत्रकार परिषदेसाठी या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, सचिव दादासाहेब रोंगे, सहसचिव उदय घोंगडे, शासकीय समन्वयक व गटविकास अधिकारी आनंद लोकरे, चेतनसिंह केदार - सावंत उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments