धक्कादायक प्रकार.. घरच्यांनी शिक्षणासाठी शहरात पाठवलं नाही, मुलाने पेटता सुतळी बॉम्ब तोंडात ठेवला आणि…
कुटुंबियांनी शिक्षणासाठी मोठ्या शहरात पाठवण्यास नकार दिल्याचा राग मनात ठेऊन एका मुलाने तोंडात सुतळी बॉम्ब पेटवत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मृत मुलाचं नाव ब्रजेश प्रजापती असून तो गेल्या काही दिवसांपासून तणावात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली.
ब्रजेशला उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात जायचं होतं. पण त्याच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्याचा सर्व खर्च करणं घरच्यांना शक्य नव्हतं.
कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणाची आवड असतानाही मोठ्या शहरात जाता येत नसल्याने ब्रजेश तणावात होता.
घटनेच्या दिवशी सकाळ 9 वाजता ब्रजेश वॉशरुमला गेला. यावेळी त्याने तोंडात सुतळी बॉम्ब ठेवत तो पेटवला. बॉम्ब फुटल्याचा मोठा आवाज झाल्याने कुटुंबिय दचलके आणि सर्वजण वॉशरुमच्या दिशेने पळाले.
तिथलं दृष्य पाहून ब्रजेशच्या आई-वडिलांच्या पायाखालची जमिनच सरकली. ब्रजेश रक्तबंबाळ अवस्थेत वॉशरुमच्या जमिनीवर पडला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.
ब्रजेशचा मोठा भाऊ ह्रदयेशने दिलेल्या माहितीनुसार ब्रजेश अभ्यासत खूप हुशार होता, स्थानिक महाविद्यलायत तो बीएससी शिकत होता.
त्याला मोठ्या शहरात शिकायचं होतं, पण इतका पैसा खर्च करणं आई-वडिलांना शक्य नव्हतं. ही बाब ब्रजेशच्या मनाला लागली होती आणि त्यातूनच त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचं ब्रजेशच्या भावाने सांगितलं.
0 Comments