धक्कादायक घटना.. जत तालुक्यात माय- लेकीचा दुहेरी हत्याकांड
अनैतिक संबंधातून खून झाल्याचा संशय; संशयीतांना घेतले ताब्यात
जत प्रतिनिधी,दुहेरी हत्याकांडाने पुन्हा एकदा सांगली जिल्ह्यातील जत तालुका हादरला असून जत तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच प्रमाण वाढत चालले आहे.
कोणीकोनूर (ता.जत ) येथे मायलेकींचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
प्रियंका बिराप्पा बेळुंखे (वय. ३२) व मोहिनी बिराप्पा बेळुंखे (वय.१३) असे हत्या केलेल्या मायलेकींची नावे आहेत. दुहेरी हत्याकांडामुळे जत तालुका पुन्हा हदरला आहे. ही घटना रविवार रात्री १० वाजण्याच्या सुमारास उघडीस आली.
हत्या कोणत्या कारणातून केली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र पोलिसांनी चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
यात मृत प्रियंकाचा पती बिराप्पा बेळुंखे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे सदरची घटना अनैतिक संबंधाच्या संशयावरून झाली असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होतीच
0 Comments