सांगोल्यात भाजपच्या वतीने घेतलेल्या बूथ सशक्तीकरण अभियानास शक्ती केंद्र प्रमुख व बुथ प्रमुखांचा प्रचंड प्रतिसाद ,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात ' कार्यक्रमाचे सर्व बूथनिहाय आयोजन
सांगोला -परंपरेने दुष्काळी असणाऱ्या सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्य क्रमाने सोडवला आहे
सध्या उन्हाळ्यातही निरा उजवा कालव्यातंर्गत सांगोला शाखा क्रमांक -४ व ५ मधून पाणी सोडून छोटे मोठे तलाव, बंधारे भरून दिले जाणार आहेत.विद्यमान आमदार शहाजी बापू आणि माझ्यातील सलोख्याच्या संबंधामुळे
तालुक्यातील जनतेला कोणतीही अडचणी समस्या येऊ देणार नाही, आलीस तर त्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी सांगितले
भाजपाचे माढ्याचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर , पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे , सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण व माढा लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे ,
भाजपाचे तालुकाध्यक्ष चेतन सिंह केदार - सावंत यांच्या उपस्थितीत काल सोमवार २४ रोजी सांगोला शहर व तालुका भाजपच्या वतीने बुथ सशक्तीकरण अभियानाच्या अनुषंगाने शक्ती केंद्रप्रमुख व बूथ प्रमुखांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीस ज्येष्ठ नेते शिवाजीराव गायकवाड संभाजी आलदर, अतुल पवार, नवनाथ पवार, उपसरपंच अनिल केदार, दुर्योधन हिप्परकर , विजयकुमार इंगोले, डॉ.अनिल कांबळे, एन वाय भोसले, आनंद फाटे, विलास व्हनमाने ,
शिवाजी आलदर , डॉ.विजय बाबर , डॉ.जयंत केदार , डॉ मानस कमलापूरकर, मधुकर पवार, संजय गंभीरे , बाळाप्पा येलपले , नागेश जोशी, गणेश कदम, शंभू माने, लक्ष्मण येलपले,
फैजुद्दीन शेख ,भाऊ पाटील , शिवाजी ठोकळे ,संजय केदार , पप्पू पाटील ,गणेश घाडगे , अमोल साखरे ,देवा कांबळे, लक्ष्मीकांत लिगाडे यांच्यासह शक्ती केंद्रासह बूथ केंद्रप्रमुख, पदाधिकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत बुथ सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक शक्ती केंद्राला विस्तारक नेमणे, प्रत्येक बूथ निहाय ११ लोकांची समिती गठीत करणे, पन्ना प्रमुख नियुक्ती करणे,
प्रत्येक बूथ निहाय दोन व्हाट्सअप ग्रुप बनवणे आणि सरल ॲप डाऊनलोड करून त्या माध्यमातून प्रत्येक बूथ व शक्ती प्रमुखांनी स्वतःसह आपल्या भागातील मतदाराची माहिती भरून डाटा तयार करावा
त्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र व राज्यातील शेतकरी सर्वसामान्यांच्या जनहिताचे घेतलेले निर्णय ,राबवलेल्या विकासात्मक योजना, कर्जमाफी सह ध्येय धोरणात्मक घेतलेले
निर्णय तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करावेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरल ॲपच्या माध्यमातून कार्यकर्त्याशी जोडले जाऊन बातचीत होणार आहे. त्याचबरोबर येत्या ३०एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ' मन की बात ' चा १०० वा. कार्यक्रम
प्रत्येक बूथनिहाय १०० लोकांच्या उपस्थित घ्यावा असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी केले यावेळी शशिकांत चव्हाण, तालुकाध्यक्ष चेतन सिंह केदार यांनी विचार व्यक्त केले.
माझ्या खासदार फंडातून सांगोला शहर व तालुक्यातील एकही गाव विकास निधी पासून वंचित राहिले नाही त्यामुळे जनतेचे मला आशीर्वाद आहेत
येत्या ३ व ४ मे ला सलग दोन दिवस सांगोला तालुक्यातील जनतेच्या समस्या अडीअडचणी जाणून घेऊन सोडवण्यासाठी वेळ देणार असल्याचे खासदार रणजीतसिंह नाईक- निंबाळकर यांनी सांगितले
0 Comments