सांगोला तालुक्यातील राष्ट्रवादीचे सतीश खंडागळे बिनविरोध
संगेवाडी (ता. सांगोला) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश मच्छिंद्र खंडागळे यांची बिनविरोध निवड झाली.
तानाजी चिंतामणी पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही निवडणूक लागली होती.
अध्यक्षपदासाठी सतीश खंडागळे यांनी एकमेव अर्ज दाखल केल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
निवडीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलालची उधळण व फटाकांचे आतषबाजी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष सतीश खंडागळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी आमदार दीपक साळुंखेपाटील म्हणाले, सोसायटी या शेतकऱ्यांच्या आर्थिक कणा आहेत.
या सोसायटीमध्ये कोणतेही राजकारण न करता शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार सुरळीत झाले पाहिजे, यासाठी नूतन अध्यक्ष व त्यांच्या संचालक मंडळाने नेहमी प्रयत्न करावा.
प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या पदाचा उपयोग आपल्या गावासाठी केला पाहिजे.
सोसायटी बाबतीत किंवा गावात कोणतीही अडचण असेल तर मी ती सोडवण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही साळुंखे पाटील यांनी यावेळी दिली.
यावेळी दामोदर वाघमारे, सुभाष पाटील, रवींद्र खंडागळे, चंद्रशेखर वाघमारे, समाधान होवाळ, गणेश खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते
0 Comments